You are currently viewing ज्ञानेश्वर माऊली

ज्ञानेश्वर माऊली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री उज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम अभंग रचना*

*ज्ञानेश्वर माऊली..*

इंद्रायणी काठी,
आळंदी नगरी !
ज्ञानाची वैखरी,
वहातसे!…….१

ज्ञानोबा माऊली,
सुखाची सावली!
समाधिस्थ येथे,
निरंतर!…..२

सोन्याचा पिंपळ,
त्याच्या पायी ज्ञाना!
करीतसे ध्याना ,
निरंतर……३

ज्ञानियांचा राजा,
शिष्य निवृत्तीचा !
सागर ज्ञानाचा ,
सर्वांसाठी…..४

मन तृप्त होई,
पाहुनी समाधी!
मनास ही शांती,
मिळतसे……५

उज्वला सहस्रबुद्धे, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा