You are currently viewing युवा पिढी मध्ये रक्तदान चळवळ निर्माण करण्याचे हॉस्पिटल नाका कला क्रिडा मंडळाचे काम कौतुकास्पद

युवा पिढी मध्ये रक्तदान चळवळ निर्माण करण्याचे हॉस्पिटल नाका कला क्रिडा मंडळाचे काम कौतुकास्पद

*युवा पिढी मध्ये रक्तदान चळवळ निर्माण करण्याचे हॉस्पिटल नाका कला क्रिडा मंडळाचे काम कौतुकास्पद*

*प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष – भाजपा , सिंधुदुर्ग* .

हॉस्पिटल नाका कला क्रिडा मंडळ , वेंगुर्ले व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान , वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. नंदकिशोर गवस यांच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ खर्डेकर महाविद्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी युवक – युवतीनी उस्फूर्त पणे सहभागी होऊन रक्तदान शिबिर यशस्वी केले .
रक्तदान शिबिराच्या सुरुवातीला बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुतळ्यास तसेच छत्रपती शिवाजीमहाराज यांना पुष्पहार अर्पण करून , तसेच दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले .
या उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रसंन्ना देसाई म्हणाले की , रुग्णसेवेमध्ये रक्तदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे . रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी रक्त जेंव्हा अनिवार्य असते तेंव्हा ते मिळविण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागते . रक्तदात्यांना संघटीत करून एकत्र आणण्याच्या दृष्टीने एकच व्यासपीठ निर्माण करण्याचा विचार घेऊन , रक्तदान ही चळवळ बनवुन काम करणाऱ्या ” सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान ” चे कौतुक केले . तसेच युवा पिढीमध्ये रक्तदानाची आवड निर्माण केल्याबद्दल हॉस्पिटल नाका कला क्रीडा मंडळाचे आभार मानले .
उद्घाटन प्रसंगी हॉस्पिटल नाका कला क्रिडा मंडळाचे अध्यक्ष ॲड. मनिष सातार्डेकर यांनी प्रसंन्ना देसाई , शाम कौलगेकर , सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान चे ॲलीस्टर ब्रीटो , कोल्हापूर जिल्हा रक्तपेढीचे डाॅ. अजय शिराळे , निलेश गवस , सुरेंद्र चव्हाण इत्यादी मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले .
यावेळी मंडळाचे योगेश गोवेकर , करण निरवडेकर , आनंद कळेकर , रुपेश सावंत , सचिन मांजरेकर , मनीष कळेकर , प्रफुल्ल सावंत , सौरभ धुरी , रामचंद्र सावंत , कौस्तुभ मयेकर ,वैभव भोसले, सौरभ भोसले, आस्वाद पोतनीस, भूषण सारंग,प्रशांत गावडे, कौस्तुभ गवस इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन योगेश गोवेकर यांनी केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा