वेंगुर्ला :
दक्षिण कोकणचा तिरुपती आणि भक्तांच्या हाकेला धावणारा अशी ओळख असलेले आरवली गावचे ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान श्री देव वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दिनांक 13 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमाने साजरा होणार आहे.
सकाळी सालंकृत पाद्य पूजा, वेतोबा दर्शन, दुपारी महाप्रसाद, सकाळपासून देवाला केळी ठेवणे, नवस बोलणे, नवस फेडणे, रात्री टाळ मृदुंगाच्या गजरात व दारूसामानाच्या आतिषबाजीत श्रींची पालखी प्रदक्षिणा होणार आहे. त्यानंतर रात्रौ नाईक मोचेमाडकर नाट्यमंडळाचे दशावतारी नाटक होणार आहे.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवार 14 डिसेंबर रोजी श्रीदेवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव होणार आहे. याच दिवशी श्री देव वेतोबाकडे नवसाचे तुलाभार व गुणीजणांचा गुणगौरव कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी, मानकरी मंडळी, ग्रामस्थ व श्री देव वेतोबा देवस्थान कमिटी आरवली यांनी केले आहे.