सिंधुदुर्गनगरी
जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा गेले आठवडाभर उफाळलेला वाद अखेर आज शमला .सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सकपदी डॉ. श्रीमंत चव्हाण यानाच ठेवण्यात आले आहे. मॅटने हा निर्णय दिला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी पत्रकारांना दिली.
जिल्ह्यातील खाजगी डॉक्टरवर्गातून जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी झाल्याने त्यांची तडकाफडकी औरंगाबाद येथे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पदी बदली करण्यात आली होती. या बदली नंतरही डॉक्टर श्रीमंत चव्हाण यांनी आपला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पदभार सोडला नव्हता. तर सिंधुदुर्गाचा जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा कार्यभार डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र श्रीमंत चव्हाण यांनी आपली खुर्ची सोडली नसल्याने तो वाद उफाळला होता .या बदलीनंतर डॉक्टर चव्हाण यांनी आरोग्य विभागाला कळवून त्यांनी मँट कडे धाव घेतली होती. त्यामुळे मॅट प्राधिकरण कोणता निर्णय देते, याकडे लक्ष लागून राहिले होते. आज गुरुवारी सायंकाळी मॅट चा निर्णय आला आणि डॉ. चव्हाण यानाच जिल्हा शल्यचिकीत्सक पदी कायम ठेवण्यात आले. त्याच्याशी संपर्क साधला असता त्यानी बदली रद्द झाल्याचे सांगितले.