You are currently viewing “पुन्हा तुझ्यासाठी” चारोळी संग्रह प्रकाशन सोहळा संपन्न

“पुन्हा तुझ्यासाठी” चारोळी संग्रह प्रकाशन सोहळा संपन्न

“पुन्हा तुझ्यासाठी” चारोळी संग्रह प्रकाशन सोहळा संपन्न

वानवडी,पुणे – (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर)

ज्ञानाई फाऊंडेशन आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा आणि कविसंमेलन लोककवी सीताराम नरके यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षाला जल अर्पण करूनी उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार मसूद पटेल, मा. राहुल रामचंद्र जाधव , संस्थापक उत्सवमूर्ती सीताराम नरके सौ विजयाताई नरके हे उपस्थित होते.
कार्यक्रमांचे प्रास्ताविक कवी डॉ चारूदत्त नरके यांनी केले . अध्यक्ष मसूद पटेल व गायक राहुल जाधव यांच्या शुभहस्ते पुन्हा तुझ्यासाठी या चारोळी संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
सीताराम नरके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की कवितेचा उमाळा हा मला पोलिस खात्यात असतानाच होता.पण मनातील हुंदके मी साचवत गेलो. समाजात घडणारे प्रसंग तरूण पिढीत होणारे बदल अन् वास्तव हे मी माझ्या कवितेत अधोरेखित केले असून वैयक्तिक जीवनात घडलेले प्रसंग नसून समाजातील लेखाजोखा मी मांडला आहे. संस्कृती संस्कार यांची पर्वणी जपत मी लेखन करू लागलो. संकल्पनेतून साकारलेला सोहळा ‌संपन्न होतोय या मला अत्यानंद होत आहे, असे ते म्हणाले
कविसंमेलनात कवी चंद्रकांत जोगदंड पुणे, रामचंद्र गुरव धायरी, डॉ बळीराम ओहोळ दैनिक टोला, संपादक छगन वाघचौरे, आनंद गायकवाड, हेमंत केतकर, बबन धुमाळ ,गायत्री नरके, मच्छिंद्र नरके, रागिणी कुदळे, हरित नरके ,माधुरी नरके कवींनी कविता सादर केल्या.
प्रामुख्याने आईबाप पैशाचे झाड बट डोळ्यावरी आली दरवळ विजय गाथा ग्रामीण जीवन शृंगाररस समजूत जिव्हाळा आपुलकी माणुसकी प्रेमभाव विविध विषयांवर कविता सादर करून रसिकांची मने जिंकली.
कविसंमेलनाचे सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी आपल्या शीघ्रकाव्यातून रसाळ वाणीतून केले. उत्सवमूर्ती लोककवी सीताराम नरके यांचा आपुलकी फाऊंडेशन इंदापूर संस्थापक अध्यक्ष केतन पाटील यांच्या वतीने निवेदक रानकवी जगदीप वनशिव यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ ग्रंथ देवून सन्मानित करण्यात आले .
राहुल जाधव एस जी फिल्म प्राँडक्शनच्या वतीने माणूस चित्रपटाची सी डी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.राहुल जाधव यांनी मित्र प्रेमावरील गीत साजर करून रसिकांची मने जिंकली. माझ्या आयुष्यात मला पहिल्यांदा विचारपीठावर बसण्याचे भाग्य नरके सरांनी दिले . मी नेहमी फोटोग्राफी करत असतो मला ही संधी देवून मला सन्मानित केले.
अध्यक्षीय भाषणात मा.मसूद पटेल म्हणाले की “माणूस नावाच केंद्र ज्याला समजत तो संवेदनशील कवी होवू शकतो मैत्री जपताना समाजाची अन् साहित्यांची सेवा करावी छंद जोपासावा कारण जगण्याचे ते मोठे भांडवल आहे आयुष्यात पुस्तके सोबत देतात अन् जिव्हाळा जपतात त्यासाठी साहित्यिकांनी चिंतन मनन वाचन करणे ही काळाची गरज आहे. ”
” वाटणी तू खुशाल कर भाई
वाटणीत मला दे तू आई”
ही गाजलेली गझल सामाजिक बांधिलकी जपत संदेश देते.
पुढे बोलताना मसूद पटेल म्हणाले,
“पाऊले निघण्या जरी धजणार नाही
थांबणे पण आता जमणार नाही”
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कवी मच्छिंद्र नरके यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा