You are currently viewing समुद्रात बुडालेल्या एकाचा शोध दुसऱ्या दिवशीही सुरूच, चार विद्यार्थिनींचा मृत्यू

समुद्रात बुडालेल्या एकाचा शोध दुसऱ्या दिवशीही सुरूच, चार विद्यार्थिनींचा मृत्यू

समुद्रात बुडालेल्या एकाचा शोध दुसऱ्या दिवशीही सुरूच, चार विद्यार्थिनींचा मृत्यू

देवगड (प्रतिनिधी) :

देवगड पर्यटनासाठी पुणे येथील संकल्प सैनिक अकॅडमीची सहल आली असताना या सहलीमधील विद्यार्थ्यांना समुद्रस्नानाचा आनंद लुटण्याचा मोह आवरला नाही.हे विद्यार्थी पाण्यात उतरून आनंद घेत असतानाच पाण्याचा अंदाज न आल्याने यातील सहाही जण बुडाले.यापैकी एकाला वाचविण्यात यश आले असून एकजण बेपत्ता आहे मात्र तो अद्याप सापडला नसल्याने दुसऱ्या दिवशीही त्याचा शोध सुरूच आहे या वेळी समुद्रात गेलेल्या चार विद्यार्थिनींचा पाण्यात बुडून मृत्यु झाला त्यांचे मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

मृत पावलेल्या विद्यार्थिनींचे नातेवाईक पुणे येथून आज देवगडला येणार आहेत यानंतर शवविच्छेदन व अन्य प्रक्रिया होऊन मृतदेह त्यांच्या ताब्यात दिले जातील

हे चारही मृतदेह काल वातानुकूलित शेवपेटी मागवून देवगड ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले ही घटना शनिवारी दुपारी ३.३० वा.सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, पुणे येथील संकल्प सैनिक अकॅडमीची सहल शुक्रवारी सिंधुदूर्ग जिल्ह्यात मालवण येथे र्पटनासाठी आली होती.शुक्रवारी मालवण पाहिल्यानंतर ही सहल शनिवारी सकाळी देवगडमध्ये दाखल झाली प्रथम श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथे दर्शन घेवून दुपारी देवगडमध्ये आल्यानंतर जेवण आटोपून पवनचक्की येथे गार्डनमध्ये गेले.यातील काही विद्यार्थी हे पवनचक्की येथून खाली देवगड बीच येथे उतरले यावेळी त्यांना समुद्रस्नानाचा आनंद लुटण्याचा मोह आवरला नाही यामुळे ते पाण्यात उतरले.मात्र देवगड समुद्रात समुद्रस्नानाचा आनंद लुटत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले.ते बुडत असताना त्यांचा सहकार्‍यांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक नागरिक, जीवरक्षक यांनी धाव घेतली.त्यांना पाण्यात उतरून वाचविण्याचा शर्थीचा प्रयत्न केला यामध्ये आकाश सोमाजी तुपे(२२, रूपीनगर पुणे) याला वाचविण्यात यश आले तर प्रेरणा रमेश डोंगरे(२१, रा.घरकुल चिखली पुणे), अनिषा नितीन पवळ(१९, रा.चिखली ताम्हाण वस्ती), अंकिता राहूल गलाटे(२१, कृष्णनगर चिखली), पायल राजू बनसोडे(२१, चिखली पुणे) यांना पाण्यातुन बाहेर काढण्यात यश आले मात्र त्यांना ग्रामीण रूग्णालयात तात्काळ नेल्यानंतर वैद्यकी अधिक्षक डॉ. विटकर यांनी चारही जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.तर यातील त्यांना वाचविण्यासाठी गेलेला विद्यार्थी रामचंद्र घनश्याम डिचोलकर(२२, कणकवली सिंधुदुर्ग) हा बेपत्ता असून त्याचा सायंकाळपर्यंत शोध सुरू होता.यातील एका विद्यार्थीनीला पोलिसांच्या गस्ती नौकेने पाण्यातून नौकेत घेतले व देवगड बंदरावर आणण्यात आले तेथून तिला देवगड ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

दरम्यान या घटनेची माहिती सैनिक अकॅडमीच्या शिक्षकांनी देवगड पोलिस स्टेशनला दिल्यानंतर पोलिस निरिक्षक निळकंठ बगळे, अेएस्आ एफ्.जे.आगा, बिर्जे, विशाल वैजल, म.पो.कॉ.सावंत, आचरेकर तसेच तहसिलदार आर.जे.पवार, नगराध्यक्षा साक्षी प्रभू आदी घटनास्थळी दाखल झाल्या.

तहसिलदार आर.जे.पवार यांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर घटनेची माहिती घेतली.दरम्यान देवगड येथील विष्णू धुरत, मंदार धुरत, जितेश मोहिते, अवि खडपकर आदी स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेवून बुडत असणार्‍या विद्याथ्र्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले.सहाजणांपैकी बेपत्ता असलेल्या डिचोलकर याचे नातेवाईक कुणकेश्वर येथे असल्याचे समजते.मात्र सांकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध घेवूनही तो सापडला नाही.

देवगडच्या इतिहासात चार विद्यार्थी एकदम बुडून मृत्युमुखी पडणे ही घटना पहिल्यांदाच घडली आहे मात्र देवगड नगरपंचायतीतर्फे जीव रक्षकांना पगार दिला जातो एवढा खर्च करू नाही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम नाही

देवगड किनारपट्टीवर एक जीव रक्षक यापूर्वीच नोकरी सोडून गेला त्या ठिकाणी दुसऱ्याची नेमणूक अद्यापही करण्यात आलेली नाही. या ठिकाणी नगरपंचायतीचा एक सफाई कर्मचारीही उपस्थित असतो मात्र तोही या दुर्घटनेच्या वेळी नव्हता तो कोठे होता याची चौकशीची मागणी नागरिक करत आहेत

हजारो लाखो रुपये खर्च करून आपत्ती व्यवस्थापनाच्या रंगीत तालीम करण्यात येतात मात्र आपत्ती आल्यावर ही रंगीत तालीम काहीच उपयोगाची नसते याचा प्रत्यय आजच्या घटनेवरून आला व्यक्ती बुडाल्यावर पोलीस हजर झाले व देवगड ग्रामीण रुग्णालयाच्या अपुऱ्या कर्मचारी वर्गाने बुडालेल्या व्यक्तींना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले सागरी पोलिसांची एकच नौका देवगड समुद्रात बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत होती देवगड मधील मच्छिमार, ग्रामस्थ यांनीच आपत्ती व्यवस्थापन राबवले. पोलीस व देवगड ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी वगळून कुठल्याही खात्याचे लोक आपत्ती व्यवस्थापनासाठी फिरकले नाहीत

*संवाद मीडिया*

*महा एक्सचेंज महोत्सव*
आपल्या कार चे वय वाढत आहे..
हाच सर्वोत्तम महिना आहे..
आपल्या जुन्या कारच्या सर्वोत्तम व्हॅल्युएशन चा..
आजच आपली जुनी कार एक्सचेंज करा आणि टाटा कार फॅमिली चे सदस्य बना..

आपल्या कार चे व्हॅल्युएशन हेच आपले डाऊन पेमेंट..ते देखील ८.३०% इतक्या कमी व्याज दर मध्ये..

*संपुर्ण स्वदेशी अभियान*

आजच भेट द्या अथवा कॉल करा

*एस. पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118611/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा