You are currently viewing जगून तर बघ चाफ्यासारखं!

जगून तर बघ चाफ्यासारखं!

*कोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखा सदस्या लेखिका कवयित्री मधुरा माणगावकर लिखित अप्रतिम ललित लेख*

 

*जगून तर बघ चाफ्यासारखं!*

(ललित लेख )

 

‘बहर तुझा तो झाडावरचा

जणू तपस्वी माळावरचा

उभा एकटा दूत शांतीचा

वसा घेवूनी दिव्यत्वाचा ‘

 

मला बऱ्याचदा हा चाफा याच रूपात दिसतो, भेटतो, मनात वेगळं घर करतो. खरं तर चाफ्याचे खूप प्रकार आहेत , देव चाफा,पांढरा चाफा, तांबडा चाफा, सोनचाफा, नाग चाफा, भुईचाफा, कवटी चाफा इ. मला मात्र चाफ्याच्या या सगळ्या प्रकारात भूल पाडतो तो हा पांढरा चाफा. जुन्या देवळांसमोर पांढरा चाफा आवर्जून दिसतो. सुंदर सुबक पाच पांढऱ्या पाकळ्या मध्ये पिवळा ठिपका असलेला हा चाफा देवाच्या पूजेसाठी वापरतात. गुढीपाडव्याला गुढीला माळ याच चाफ्याच्या फुलांची असते.

हा चाफा दिसला की मला पद्मा गोळे यांची कविता आवर्जून आठवते. चाफा हे प्रतिक घेऊन त्यांनी निशब्द, निर्मळ,निरागस, प्रेमाची सुंदर अनुभूती इतक्या सुबक शब्दात गुंफली आहे की ती काळजाचा ठाव घेते, मन भरून येते. त्या म्हणतात,

 

चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा

का बर आलास,आज स्वप्नात

तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं

दुःख नाही उरलं आता मनात

पानांचा हिरवा,फुलांचा पांढरा

रंग तुझा रंगतोय माझ्या मनात

असा हा चाफा भुरळ पाडणारा. वसंत ऋतू पासून शरदा पर्यंत बहरत असतो. कोणी सोबत असो वा नसो, कुणी कौतुक करो वा ना करो हा वाट नाही बघत एकटाच बहरत सुटतो. याच्या बाबतीत मी वाचलेल्या आणि मला खूप आवडलेल्या छान ओळी आहेत, ज्यांनी मला चाफ्याची एक वेगळी ओळख करून दिली त्या अशा,

” वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही,

शेवटी पानांनीही साथ सोडली पण पठ्ठयानं बहरणं सोडलं नाही “.

या ओळींनी माझा चाफ्याच्या झाडाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. मला स्वतःला माझीच लाज वाटली. आपण माणसं प्रत्येक गोष्टीत मदतीची, कौतुकाची अपेक्षा करतो. खरं तर या चाफ्या सारखं जगता आलं पाहिजे.

मला कसं जमेल, एकट्याला जमलं नाही तर लोक काय म्हणतील यात आपण स्वतःला एवढे गुरफटून घेतो की या कोषातून बाहेरच पडत नाही म्हणूनच चाफ्यासारखं जगता आलं पाहिजे. असं झालं तर जगातील भव्यता नजरेत भरेल, झपाटलेपण अंगात उतरेल, ध्येयवेडी माणसे आणि त्यांचे कार्य दिसू लागेल आणि मग आपणही खारीचा वाटा उचलायला हवा असे मनोमन वाटेल. हे समाजभान नकळतपणे हा चाफा शिकवून जातो. मग बाबा आमटेंसारखी ध्येयवेडी माणसे आपल्याला दिसू लागतात. हेमलकसाच्या जंगलातबाबा आमटे यांनी आनंदवन फुलवलं. कशासाठी जगावे हे त्यांच्याकडून शिकावं. कुष्ठरोग्यांसाठी संपूर्ण आमटे कुटुंबीय समर्पित झालेले पाहून नतमस्तक व्हायला होतं. समाजभान काय असतं हे बाबांचं आनंदवन सांगतं. बाबा आमटे सहजपणे म्हणतात,

शृंखला पायी असू दे

मी गतीचे गीत गाई

दुःख उगळायास आता

आसवांना वेळ नाही

आमटे कुटुंबीय, डॉक्टर अभय बंग, सौ. राणी बंग, आपले सर्वांचे लाडके अभिनेते नाम फाउंडेशनचे जनक नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचे कार्य नव्या पिढीला आदर्शवतच आहे. ही सगळीच माणसं माझ्यासोबत मदतीला कितीजण येणार आहेत याची वाट बघत नाहीत कारण त्यांचं ‘मी ‘पण इतकं सहजपणाने गळून गेलेलं आहे की,

जळापरी मन निर्मळ ज्यांचे

गेले तेथे मिळले हो

चराचराचे होऊन जीवन

स्नेहासम पाजळले हो

याप्रमाणेच असतं. ‘मी ‘त्यांना माहीतच नसतो. त्यांनी आपल्या गरजा सीमित केल्या आणि जगणं सोपं केलं. अशी असामान्य माणसे आहेत म्हणूनच जग अजूनही सुंदर आहे. ही माणसे मनाचा सेतू बांधतात, हृदयाची नाती जोडतात. या नात्यात असतं ते फक्त समर्पण आणि कमल पत्रावरील दवबिंदूंची निर्मळता त्यामुळेच ही नाती अभेद्य असतात. उपचाराने जपावी लागत नाहीत. ती आनंदघन घेऊन येतात आणि बरसत राहतात.

यासाठी आधी स्वतःचं मनोबल वाढलं पाहिजे. स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे. मदतीच्या कुबड्या हव्यातच कशाला म्हणून हा चाफा मला सतत मोहात पाडतो, जगण्याला नवी दिशा देतो. फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेता आली पाहिजे. असे कितीतरी फिनिक्स आपल्यातही आहेतच की, अपघातात एक पाय गमावलेले, हात नसलेले, जन्मतःच अंध असलेले पण या सगळ्या व्यंगांवर, अपंगत्वावर मात करून कुणी उत्तम नर्तक होतो, कुणी चित्रकार होतो तर कुणी मॅरेथॉनची स्पर्धा जिंकतो. हे सगळं बघितलं की वाटतं असा विश्वास पाहिजे स्वतःवर आणि स्वतःच्या प्रबळ इच्छाशक्तीवर. हेच वेडेपीर अंधारातही प्रकाशवाटा निर्माण करतात. यावर गुरु ठाकूर यांची खूप समर्पक कविता आहे जी मला खूप आवडते,

असे जगावे छाताडावर

आव्हानांचे लावून अत्तर

नजर रोखूनी नजरेमध्ये

आयुष्याला द्यावे उत्तर

असे दांडगी इच्छा ज्याची

मार्ग तयाला मिळती सत्तर

नजर रोखूनी नजरे मध्ये

आयुष्याला द्यावे उत्तर

मग कराल ना विचार? बहरूया आपणही चाफ्यासारखे. मला तरी तुम्हा सगळ्यांना मनापासून सांगावेसे वाटते,

*जगून तर बघूया चाफ्यासारखं!*

 

सौ. मधुरा महेश माणगांवकर

आजीव सदस्या

को.म.सा.प. मालवण

मोबाईल नं 9421263637

 

 

*संवाद मिडिया*

 

💥 *”रेन्बो हिल्स” ची खास “दिवाळी फेस्टिवल ऑफर”..💥🏬*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨

 

मळगाव-कुंभार्ली🏕️ येथील ️ रेरा ॲक्ट📜 नुसार मान्यता📃 असलेल्या न्यू-मॅक्स डेव्हलपर्स🏠 यांच्या “रेन्बो हिल्स🌈” मध्ये ग्राहकांसाठी🥰 आम्ही देतोय खास “दिवाळी फेस्टिवल ऑफर”…!🚩💥🤩

 

👉 स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि GST फ्री… फ्री… फ्री…!!!

 

🔸 बँक मान्यता प्राप्त प्रोजेक्ट,

🔹सॅम्पल सदनिका रेडी,

🔸गृह कर्जाची सुविधा,

🔹दिलेल्या वेळेच्या अगोदर पझेशन…!

 

🛑रेरा नं. P52900022211

 

फक्त ५१ हजारात आपल्या स्वप्नातील घर बुक 💰 करा..🤟

 

🏚️New Max Developers🏘️

यांचा चौथा महत्त्वकांक्षी प्रकल्प

🌈”रेन्बो हिल्स”🏞️

 

🛑आम्ही मळगाव येथे देतोय:-

👉1RK फ्लॅट्स फक्त १५.५० लाख

👉1BHK फ्लॅट्स फक्त १९.५० लाख

👉2 BHK फ्लॅट्स फक्त २५.५० लाख

 

👉तात्काळ बुकिंग📃 केल्यास अजून ५० हजाराची💰 सवलत…! तर ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी..🗓️!

 

मग वाट कसली बघताय..!🤔 ५१ हजार 💰 रुपये द्या..! आणि आपला हक्काचा 🏦 फ्लॅट🏢 तात्काळ बुक करा…!🔖

 

🛑आमची वैशिष्ट्ये:-👇

 

♦️सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन हाकेच्या अंतरावर…!🗣️

♦️मुंबई-गोवा महामार्ग अवघ्या पाच मिनिटावर…!🛣️

♦️सावंतवाडी बाजारपेठ पाच किलोमीटरवर…!🛍️

♦️निसर्गरम्य आणि शांत वातावरणात राहण्याचा आनंद.!🌴

♦️उच्च प्रतीचे बांधकाम आणि सुसज्ज इमारती…🏢

 

🏡आमचा पत्ता:-

सावंतवाडी रेल्वेस्टेशन जवळ, शालू हॉटेलच्या बाजूला, कुंभार्ली-मळगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

📲संपर्क:-

9653693804 / 8104829770

 

*YouTube Link👇*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा