सिंधुदुर्गनगरी
युरोपिय युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्या मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षण आंबा बागांची नोंदणी केली जाते. सन 2019-20 मध्ये 7 हजार 944 निर्यातक्षण आंबा बागांची नोंदणी झालेली आहे. निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी करिता मँगोनेट ही ऑनलाईन प्रणाली दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. निर्यातक्षम बागांच्या नोंदणी करिता अपेडाने पार्म रजिस्ट्रेशन मोबाईल ॲप उपलब्ध केलेले आहे. सदर ॲप डाऊनलोड करून नोंदणी सुविधा करण्यात आलेल्या आहेत. तरी सर्व आंबा बागायतदारांनी सन 2020-21 करिता नोंदणी करण्यासाठी संबंधित कृषि सहाय्यक, कृषि पर्यावेक्षक, कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून त्वरीत अर्ज करावेत. निर्यातक्षण आंबा बागांची नोंदणी 5 वर्षांसाठी वैध असेल. त्यामुळे गतवर्षी नोंदणी केलेल्या आंबा बागांची नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. नव्याने नोंदणी करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज, सात बारा, आठ अ, बागेचा नकाशा इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे. मँगोनेट द्वारे नोंदणी करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2020 अशी आहे. निर्यातक्षम बागांची वेळेत नोंदणी करणे करिता संबंधित जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधून विहीत मुदतीत नोंदणी करण्याचे आव्हान संचालक, फलोत्पादन यांनी केले आहे.