*वेंगुर्ले तालुक्यात खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते टेलिफोन टाॅवर भूमिपूजना पुर्वी सर्व ठिकाणी भाजपाच्या वतीने भूमिपूजन*
*केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या प्रयत्नातून वेंगुर्ले तालुक्यात २२ टाॅवर मंजूर झाल्यावर , फुकाचे श्रेय घेण्यासाठीच खासदार विनायक राऊत यांची धडपड …….*
*भाजपाचा आरोप*
वेंगुर्ले तालुक्यात खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक ८ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून चिपी , परुळे बाजार – कर्ली , कुशेवाडा – प्राथमिक आरोग्य केंद्र , मेढा – श्रीरामवाडी , वायंगणी – हरिचरणगीरी , दाभोली , खानोली , वेतोरे , मोचेमाड , सागरतीर्थ – टाक , आरवली – सोन्सुरे , शिरोडा – केरवाडा , पेंडुर अशा १३ ठिकाणी भूमिपूजन समारंभ उबाठा सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. परंतु वेंगुर्ले तालुक्यातील २३ टेलिफोन टाॅवर हे केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेबांच्या प्रयत्नातून मंजूर झाले असल्याने भाजपाच्या त्या त्या ठिकाणच्या सरपंच व पदाधिकाऱ्यांकडून , खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन होण्यापूर्वीच भाजपाच्या माध्यमातून भूमिपूजन केले .
*चिपी येथे भूमिपूजन*
चिपी येथील bsnl टॉवर चे भूमिपूजन ग्रामस्थांतर्फे व माजी सभापती निलेश सामंत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या भागातील कित्येक वर्षे मागणी असलेले मोबाईल टॉवर केंद्रीय मंत्री नामदार नारायण राव राणे साहेब यांच्या प्रयत्नाने दुरसंचार खात्या मार्फत मंजूर करण्यात आले आहे त्याठिकाणी विना मोबदला जमीन उपलब्ध करून देण्यासाठी स्थनिक ग्रामपंचायत व भाजपा कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले असे असताना उबाठा सेने कडून खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रम आज सकाळी 11 वाजता परस्पर ठरविण्यात आला होता तत्पूर्वी 9:30 वाजता स्थानिक चिपी ग्रामस्थांनी सदर कार्यक्रम माजी सभापती निलेश सामंत यांच्या नेतृत्वाखाली संपन्न केला. जमीन मालक गुणाजी सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चिपी सरपंच माया माडये उपसरपंच प्रकाश चव्हाण चिपी ग्रामपंचायत सदस्य कुशेवाडा सरपंच निलेश सामंत युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर साईनाथ माडये प्रकाश राणे सुनील चव्हाण सुधीर पेडणेकर मोठ्या प्रमाणात चिपी ग्रामस्थ उपस्थित होते.
*वेतोरे येथे भूमिपूजन*
आज दिनांक 8/12/2023रोजी सकाळी मिरमेवाडी वेतोरे येथे मोबाईल टॉवर चे उद्घाटन मा.सरपंच सौ.प्राची नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.त्यावेळी उपस्थित उपसरपंच सौ.संतोषी गावडे,माजी उपसभापती सौ.स्मिता दामले ,माजी चेअरमन विजय नाईक,शक्तीकेंन्द्रप्रमुख सुधीर गावडे,ग्रा.पं.सदस्यविनायक गावडे,, तुषार नाईक, विक्रम सावंत,साक्षी राऊळ, प्रकाश गावडे, सुजाता वालावलकर,जागा मालक नारायण शेणवी, ग्रामस्थ आपा गावडे, अशोक गावडे,व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
*खानोली येथे भूमिपूजन* खानोली गावामध्ये भारत संचार निगम लि.(B.S.N.L.) टाँवर चे भुमिजन साहळ। आज दि.०८//१२//२०२३रोजी मान्यवरांचे हस्ते संपन्न झाला.यावेळी खानोली गावचे सरपंच सुभाष खानोलकर , बाळा सावंत, वसंत तांडेल , शरदजी चव्हाण , सुनिल घाग , विष्णु खानोलकर,मनोहर खानोलकर, चंद्रकांत खानोलकर ,अण्णा खानोलकर ,शामा खानोलकर, शिवाजी रांजणकर,श्री.केळकर जतिन आवळेगांवकर उपस्थित होते.
*वायंगणी – हरिचरणगीरी* वायंगणी ग्रामपंचायत हद्दीतील हरिचरणगिरी येथील श्री गणेश मूर्ती कला आकार केंद्र नजिक मंजूर झालेल्या बी एस एन एल टॉवरचे उदघाटन माजी सरपंच श्री शामसुंदर मुणनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खालील पदाधिकारी उपस्थित होते . जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रसन्ना (बाळू) देसाई , जिल्हा निमंत्रित सदस्य श्री साईप्रसाद नाईक ,
तालुका सरचिटणीस श्री प्रशांत खानोलकर , माजी सरपंच श्री शामसुंदर मुणनकर , उपसरपंच श्री रवींद्र धोंड , सदस्य श्री अनंत मठकर , सदस्य श्री महेश मुणनकर , सदस्य श्री अंनत केळजी , सदस्य सौ विद्या गोवेकर , सदस्य सौ राखी धोंड ,
सदस्य सौ सविता परब ,
*ग्रामस्थ* श्री सुरेश करंगुटकर, श्री दीपक करंगुटकर, श्री गोपाळ करंगुटकर, श्री बाळा धोंड, श्री विठ्ठल सातार्डेकर, श्री राजेश घोलेकर आदी उपस्थिती होते.
*अणसुर*
अणसुर येथील ग्रामस्थ लवु आत्माराम गावडे , जयराम आ. गावडे , विलास आ.गावडे , नारायण आ.गावडे व गावडे कुटुंबीयांनी टाॅवर साठी मोफत जागा दिल्याबद्दल सरपंच सत्यविजय गावडे यांनी गावाच्या वतीने आभार मानून , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले . यावेळी सरपंच सत्यविजय गावडे , उपसरपंच वैभवी मालवणकर , शक्तिकेंद्र प्रमुख गणेश गावडे , बिट्टु गावडे , विजय सरमळकर , प्रभाकर गावडे , सुधाकर गावडे , चंद्रकांत गावडे , रमाकांत गावडे , संभाजी गावडे , बाळा मुळीक , संदेश गावडे , मंगेश गावडे , प्रकाश गावडे , गोपी गावडे , बाळकृष्ण गावडे , शैलेश गावडे , सचिन गावडे, भुषण गावडे, रवींद्र गावडे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते .
*संवाद मीडिया*
*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*
*💎एस.पी.बोअरवेल💎*
*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*
💁♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*
*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*
*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*
*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*
*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*
*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*