बांदा :
पणदूर-कुडाळ येथील सविता अनाथ आश्रमाला शेर्ले येथील युवक मुकेश खोबरेकर व मित्रमंडळाने जीवनावश्यक वस्तू व कपडे देणगीदाखल दिलेत.मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने आश्रमातील कपडे व्यवस्थापनाने जाळून टाकण्यात आले होते. त्यानंतर आश्रमकडून कपडे व जीवनावश्यक वस्तू देण्याबाबत आवाहन करण्यात आले होते.
शेर्ले येथील खोबरेकर या युवकाने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून वायफळ खर्च न करता सविता आश्रमाला मदत करण्याचा निर्णय घेतला. यावेळी गहू, तांदूळ, जीवनावश्यक वस्तू तसेच आश्रमसाठी कपडे देण्यात आले. यावेळी प्रसाद शिरसाट, संदीप नार्वेकर, सुशील गुळेकर आदी उपस्थित होते. खोबरेकर यांच्या दातृत्वाचे कौतुक होत आहे.