जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र,सिंधुदुर्गच्या वतीने दिव्यांगांचा जिल्हास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न
सिंधुदुर्ग
जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून 3 डिसेंबर रोजी ” *जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र,सिंधुदुर्ग* ” या संस्थेच्या वतीने सिद्धिविनायक हॉल कसाल येथे दिव्यांगांचा जिल्हास्तरीय मेळावा घेण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी कसाल गावचे सरपंच राजनजी परब, प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती कुडाळचे दिव्यांग विभागाचे अधिकारी श्री पाटेकर, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र,सिंधुदुर्ग चे जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे, भीमराव हळदीकर, शामसुंदर नारायण लोट, नीलम राणे, दीक्षा तेली, प्रकाश सावंत, आरती बापट ,विजय कदम, भडगावचे मान. सरपंच राणे, सत्यवान पावले, कासवकर, राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांचा उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपरोक्त संस्थेच्या वतीने दीक्षा तेली व नीलम राणे यांनी सर्वांचे स्वागत केले.
त्यानंतर जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र,सिंधुदुर्ग चे जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे सर यांनी प्रास्ताविक करून जागतिक अपंग दिनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी भीमराव हळदीकर यांनी हेल्प फॉर द हॅंडीकॅप च्या माध्यमातून कोल्हापूर येथे दिव्यांग विद्यार्थी शालेय उच्च शालेय शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी मोफत वस्तीगृहाची मोफत सुविधा असल्याचे सांगितले.
श्री पाटेकर साहेब यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर ह भ प कीर्तनकार मा. आरती बापट यांनी “सर्व दिव्यांगांनी संघटितपणे एकत्र येऊन आपले हक्क मिळवलेच पाहिजेत” असे उद्गार व्यक्त केले.
सदर मेळाव्यात दिव्यांग बांधवांनी विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेत आपला आनंद द्विगुणीत केला. परीक्षक म्हणून पाटेकर सर यांनी भूमिका बजावली. सर्व स्पर्धा संपल्यावर बक्षिसे वितरण करण्यात आली.
तदनंतर आरती बापट यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.