नौसेना दिनाच्या निमित्ताने मालवण समुद्र किनारा गर्दीने फुलला
मालवण:
नौसेना दिनाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळातच मालवण येथे दाखल होणार आहेत. त्यांच्या उपस्थित आजचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या सोहळ्याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी समुद्र किनाऱ्यावर गर्दी केली आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात पोलिसांसह नेव्हीच्या माध्यमातून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी मोदी यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सोहळ्याला अनन्यसाधारण महत्व आहे.
आता काही वेळातच राजकोट किल्यावर मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण व भारतीय नौसेनेचा नौदल दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर ४ वाजल्या पासून नौदलाकडून प्रात्याक्षिके ४ करण्यात येणार आहेत.दरम्यान मुख्य कार्यक्रम स्थळी सर्वसामान्य लोकांना अटकाव करण्यात आला आहे. तर दांडी, काळेथर, तारकर्ली आदी विविध ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांसाठी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे.