You are currently viewing “गोंदवल्यातील स्पंदने”

“गोंदवल्यातील स्पंदने”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम गीत रचना*

  • *”गोंदवल्यातील स्पंदने”*

गोंदवल्यात घ्यावे महाराजांचे दर्शन
समाधी पाहता मिळे आनंद ब्रह्मानंदIIधृII

गोंदवल्यात जाणवे स्पंदन अणूरेणूंत
सर्वांचे मुखी श्रीराम नाम आपोआप येत
शतकोत्तर वर्षे चाले पूजा अन्नदानII1II

कशाची न उणीव महाराज ऐश्वर्यावान
पंच-सेवक निष्काम करिती व्यवस्थापन
महाराज सेवा करून घेती सर्वांकडूनII2II

गोंदवल्यात बंधू भगिनींचे नातं भेदातीत
सद्गुरूंचे आशिशे नामभक्तीने प्रेरित
प्रत्येकाला सेवा मिळे प्रेम इच्छेप्रमाणंII3II

काकड आरती फुगड्या फेर नवनीत
कृष्ण तुळशी गोसेवा पूजा पर्यावरण
गोंदवले आहे नाम विश्व विद्यापीठII4II

संसारी असून वागले संन्यासी वृत्तीनं
आईसाहेब सावली सर्वस्व समर्पण
सेवा करिती रामाची महाराजांचे साक्षीनंII5II

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा