You are currently viewing सृजनशील साहित्याला.. मिळालेलं मानाचं स्थान असलेला दिवाळी अंक म्हणजेंच…”साहित्य प्रकाश… दिपावली विशेषांक नोव्हें २०२३

सृजनशील साहित्याला.. मिळालेलं मानाचं स्थान असलेला दिवाळी अंक म्हणजेंच…”साहित्य प्रकाश… दिपावली विशेषांक नोव्हें २०२३

ठाणे :

 

 

 

सृजनशीलता ही प्रत्येक मानवांत असते, पन् त्याची जांन सर्वांनाच असते असे नाही. अशा सृजनशीलतेतुन काहीजन आपल्या मनातील भाव भावना,तसेच जगातील अनुभव,आपल्या सृजनशील मनातुन शब्दांद्वारे व्यक्त करतात. ह्यातुनंच सृजनशील साहित्यिक जन्माला येतो. अशा सृजनशील साहित्यिकांना एक छानसं व्यासपीठ असलेला, “साहित्य प्रकाश दिपावली विशेषांकाचे नोव्हेंबर, २०२३” नुकताच प्रकाशित झाला आहे.

वक्रतुंडचे, संस्था-संपादक-जगन्नाथ खराटे, ह्यांनी “साहित्यप्रकाश दिपावली अंकाचे” सुरेख संपादन केले असून ह्या अंकात, एकुन २१ लेखकांचे वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपुर्ण असे साहित्य प्रकाशित करण्यात आले आहे.

ह्या दिपावली विशेषांकांसाठी मुख्यत्वे – ले- प्राची वैद्य लिखी सब लिखीत-मैत्री, ले – प्रशांत शिरुडे ह्यांचा, छत्रपती शिवाजी महाराज एक प्रेरणास्रोत,.ले-काश्मीरापं गुप्ते लिखित कथा एका गावाची अगदी वैशिष्ट्यपुर्ण कथांचा समावेश केला आहे.

तसेच, काव्यलेखनासाठी, मातुभुमी भारत देशास – काव्यमय पत्रलेखन – सुनंदा अमृतकर.. दिवाळी दर्शन- मनीषा जोशी..विरहातील भावना-रोहन ढगे.. ज्ञानियांचा राजा-मंजुषा पागे.. माझी शाळा हरवली माय- प्रशांत लिंगाडे..बालकवीता, चारोळ्यामोहन दुसाने..जिद्द-सुरज गेल्ये..

व्यक्ती परिचयसाठी लेखन,संगीत साधनेचे उपासक- अविनाश चोपडेकर..जेष्ठ नागरिक संस्था परिचय -सस्थापिका-योजना घरंत.. पुस्तक परिचय-जगन्नाथ खराटे..

पाककृती विषयक लेखन-ऊज्वला कोल्हे.. काव्यमय पाककृती-वैशाली पडवळ..स्वामी कृपेचा साक्षात्कार-सुभाष बिडकर..,बाप , शांत निसर्ग (कविता)-गोरखनाथ पवार, एक कृर्म चुकीचे (अध्यात्मिक)-निर्मला बस्तवडे,..खुशखुशीत सदर-आरोग्यविषयक माहिती लैलेशा भुरे..जिवन एक रंगमंच-डॉ शुभांगी गादेगावकर.. शिवमयी विचारधारा-प्रा-कु.श्रद्धाजी शेट्ये.. आणि शिवचरित्र, श्रीगणेश गाथा, भगवान सांबसदाशिव.चित्राकृती ‘रेखाटन..कु-ओम गणेश गादेगावकर (मिरा भाईंदर) इ मान्यवरानी अनमोल सहभागी होवुन विशेष योगदान दिले आहे.

जीवनातील वैविध्यपूर्ण भावभावनांचे,अनुभवांचे कथा,काव्य,चरित्र इ विविध साहित्यातुन विहंमय रेखाटन करुन मानसिक समाधान देईल. तसेच ही साहित्यकृती रसिक वाचकांच्या ज्ञानांत भर पडेल,अशा दिपावली विशेषांकाचे वाचक नक्कीच स्वागत करतीलंच,, अगदी वाजवी किमतीत खरेदीसाठी किताब रायटींग पब्लिकेशन्सशी,७५०६९९४८७८ नंबरवर संपर्क साधावा आणि साहित्य प्रकाश दिपावली विशेषांक अवश्य वाचावा.

 

संपादक-जगन्नाथ खराटे, ठाणे

प्रतिक्रिया व्यक्त करा