मालवण :
सोमवार दिनांक ४ डिसेंबर रोजी चौके गावची ग्रामदैवता व श्रध्दास्थान श्री देवी भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव साजरा होणार आहे. यावेळी सकाळी १० वाजता श्री देवीची मानाची ओटी भरणे. त्यानतंर आलेल्या भाविकांच्या ओट्या भरणे, नवीन नवस बोलणे त्यानतंर नवस फेडणे अशा कार्यक्रम दिवसभर चालू असणार आहे त्यानंतर रात्री ११-३० वाजता पालखी मिरवणूक व त्यानंतर चेंदवण दशावतारी नाट्य मंडळ, कवटी याचा नाट्यप्रयोग सादरा होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या जत्रौत्सवामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन गांवकरी मडंळानी केले आहे.
आबेंरी श्री.सकलेश्वर जत्रा दिनांक ६ डिसेंबरला चौके – आंबेरी येथील श्री.सकलेश्वरचा जत्रौत्सव बुधवार दिनांक ६ डिसेंबरला साजरा होत आहे.यावेळी सकाळपासून कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे.चौके येथील श्री.देवी भराडी मातेची पालखी सपुर्ण आंबेरी गावातून फिरत फिरत श्री.सकलेश्वर मंदिरामध्ये आल्या नतंर मंदिर परिसरामध्ये पालखी मिरवणूक होणार त्यानंतर रात्री चेंदवणकर दशावतारी नाट्य मंडळ,कवठी यांचा दशावतारी नाट्य प्रयोग सादर होणार आहे.त्यानतंर दुसर्या दिवशी गाडगे फोडून झाल्यानतंर मानकर्याचा सन्मान स्वीकारून श्री.देवी भराडी मातेची पालखी आपल्या मुळ जागेवरती म्हणजे चौके गावा येण्यास निघते.चौके या ठिकाणी पालखी आली की चार दिवस चालू असलेल्या जत्रोत्सावाची सांगता होते. या जत्रोत्सावा ‘बहीण भाऊ’ भेट म्हणून ओळखले जाते.तरी या जत्रोत्सावामध्ये सर्व भाविकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन श्री.गावडे व श्री.परब मानकरी मंडळाने केले आहे.