आमदार नितेश राणे मतदार संघात 12 स्क्रीनवरून दाखविणार नौसेना दिनाचे थेट प्रक्षेपण
कणकवली
चार डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे होणारा नौसेना दीन मतदार संघातील जनतेला पाहता यावा. त्या ठिकाणी होणाऱ्या नौदलाच्या कवायती जनतेला अनुभवता याव्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकता यावेत यासाठी आमदार नितेश राणे हे मतदारसंघातील कणकवली, देवगड,वैभववाडी या तिन्ही तालुक्यात बारा ठिकाणी स्क्रीन लावून थेट प्रक्षेपण करणार आहेत. त्याबाबतची माहिती त्यांनी आज दिली.
कणकवली तालुक्यात,कणकवली शहर नांदगाव,तळेरे, फोंडाघाट, नाटळ, वैभववाडी तालुक्यात वैभववाडी शहर, भुईबावडा, कोकीसरे, तर देवगड तालुक्यात देवगड शहर, शिरगाव, तळेबाजार , पडेल अशा एकूण बारा ठिकाणी या स्क्रीन लावून मालवण येथे होणारा संपूर्ण कार्यक्रम थेट प्रक्षेपित करून दाखवला जाणार आहे.
चार डिसेंबर हा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात फार मोठा सुवर्णक्षण आणणारा दिवस आहे. मालवण येथे नौसेना दिवस साजरा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला दिलेली ही फरमोठी मानवंदना आहे. यापूर्वी अशी मानवंदना कोणीच दिलेली नसेल. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी मनापासून आभार मानतो तर नौसेना विभागाला धन्यवाद देतो.अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी आभार व्यक्त केले.