You are currently viewing नापणे येथे गोवा बनावटीची साडेपाच लाखाची दारू जप्त…

नापणे येथे गोवा बनावटीची साडेपाच लाखाची दारू जप्त…

नापणे येथे गोवा बनावटीची साडेपाच लाखाची दारू जप्त…

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई; ३४ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त….

कणकवली

वैभववाडी येथे आलिशान कार मधून गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कणकवली पथकाने कारवाई केली. यात ५ लाख ५५ हजाराच्या दारूसह ३४ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई नापणे येथे रात्री दीड वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी आलिशान चारचाकीला इन्सुलि चेकपोस्ट येथे तपासणीसाठी थांबविण्यासाठी इशारा करण्यात आला होता. मात्र या कार चालकाने हुलकावणी देत पुढे वेगाने निघून गेला. यावेळी राज्य मार्गावरील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कणकवली पथकास याची माहिती देवून संबंधित कार थांबविण्याची मागणी केली. त्यानुसार कणकवली विभागाने व तपासणी नाका येथील पथकाने संयुक्तपणे कारचा पाठलाग केला. त्याने ताब्यातील कार ही मुंबई-गोवा महामार्गावरून खारेपाटण व तेथून परत वैभववाडीच्या दिशेने फिरवले. मात्र मागाहून असलेल्या पथकाने पाठलाग सुरूच ठेवला. मात्र पुढे कार नापणे रस्त्याला वळविली त्यावेळी मात्र पुढे असणारा रस्ता हा अरुंद असल्याने कार चालक फसत चालला होता. त्याने ताब्यात असलेली कार आजूबाजूच्या जंगलमय भागाचा व काळोखाचा फायदा घेवून कार तिथेच सोडून पसार झाला. यावेळी सदर वाहनातून गोवा राज्य बनावटी दारुचा मुद्देमाल जप्त करुन कार वाहन ताब्यात घेण्यात आली.
ही कारवाई अधीक्षक वैभव व्ही. वैद्य यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक प्रभात सावंत, एस. डी. पाटील दुय्यम निरीक्षक, प्रदिप रास्कर, दुय्यम निरीक्षक, तपासणी नाका- गोपाळ राणे सहाय्यक दुय्यम निरीक्षक, सुरज चौधरी सहाय्यक दुय्यम निरीक्षक, रणजित शिंदे जवान – नि – वाहनचालक, महिला जवान स्नेहल कुवेसकर, यांनी सहभाग घेतला होता. याबाबत पुढील तपास संतोष पाटील, दुय्यम निरीक्षक कणकवली करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा