You are currently viewing तुला अंतरी जपते

तुला अंतरी जपते

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समुहाच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री सौ.स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*तुला अंतरी जपते*

तुला अंतरी जपते
तूच भावविश्व माझे
लेखणीत अंकुरते
गंधाळले प्रेम तुझे

कवितांचे फुलतील
मन मंदिरात मळे
उमलत्या भावनांचे
रंग गहिरे सगळे

अलंकृत वृत्तबद्ध
मनी कविता स्फुरते
अक्षरात न्हाहलेले
काव्य शब्दांत रुजते

कसे वाहती निर्झर
अवघड दिसे वाट
सुखदुःख कोसळती
आसवांचा वाहे पाट

दुधाळल्या धुक्यातुनी
धुसरली चित्रे सारी
उमटल्या रेघोट्यात
कल्पनांचे विश्व भारी

सौ स्नेहा धोंडू नारिंगणेकर
शिरोडा सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा