You are currently viewing बाईचं बाईपण

बाईचं बाईपण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

*बाईचं बाईपण*

————————
खरं तर बाईला तिचं
बाईपण नको असत
पण बाई शिवाय
घराला घरपणही नसतं
कारण घराची सुत्र
तिलाच स्विकारायची असतात
तिच्याशिवाय देव्हाऱ्यात
दिवे लागत नसतात

आयुष्यभर संघर्षाचा प्रवास
तिचं एकटी करत असते
बाई म्हणून ती कोणालाही
कळत नसते
देह तिचा आतल्याआत
जळत असत
तिच्या बाईपणाला
कुणाचाच आधार नसतो

घराचा उंबरठाही
बाई शिवाय कोणी पुजत नाही
तिने उंबरठा पुजल्याशिवाय
घरात कुणाचा प्रवेश होत नाही
तिचा जन्म घेण्याने
किती संदर्भ बदलतो
तिच्यामुळे तर घराचा उध्दार होतो

तिचं जगणं कोणी समजून घेत नाही
तिचा विटाळ ही कोणाला सहण होत नाही
बाळंतपणाचा त्रास सहण करून
ती वंशावळ वाढवत असते
पाच दिवस तिचं बाईपण
ती दुर ठेवत असते

ती कधीच सांगत नाही
तिच्या मनातल्या वेदना
आणि कुणालाही कळत नाही संवेदना
किती किती नजरांनी ती
कितीदा घायाळ होत असते
अशाही गर्दीतर ती तिचं
बाईपण सांभाळत असते

बाई आणि भुईचं सारखंच असत
अवकाळी वेदनेत मरायच असतं

*संजय धनगव्हाळ*
धुळे

प्रतिक्रिया व्यक्त करा