You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील वेंगुर्ले सर्कल च्या वेदर स्टेशन ( तापमापन यंत्र ) चे उद्घाटन

वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील वेंगुर्ले सर्कल च्या वेदर स्टेशन ( तापमापन यंत्र ) चे उद्घाटन

*वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील वेंगुर्ले सर्कल च्या वेदर स्टेशन ( तापमापन यंत्र ) चे उद्घाटन*

*शेतकऱ्यांनी मानले पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार*

वेंगुर्ले सर्कल मधील वेदर स्टेशन ( तापमापक यंत्र ) हे पुर्वी तहसीलदार कार्यालय परिसरात होते , त्या परिसरात थिबक सिंचन ने फुलझाडांना पाणीपुरवठा होत असल्याने त्या भागात सातत्याने गारवा असल्याने उष्म हवामानाची नोंद होत नव्हती , त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत होता . तापमान तंतोतंत मिळत नसल्याने गेली तीन – चार वर्षे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते . शेतकरी शासनस्तरावर वारंवार पाठपुरावा करत होते , परंतु त्याला यश येत नव्हते .
परंतु भाजपा च्या किसान मोर्चा पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे यशस्वी पाठपुरावा करून वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण व वेंगुर्ले सर्कल मधील वेदर स्टेशन ची जागा बदलुन ३० नोव्हेंबर च्या आत योग्य ठिकाणी बसविण्यात आली . यामुळे वेंगुर्ले शहर , मठ , उभादांडा , आडारी , मोचेमाड या महसूली गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे , त्यामुळेच शेतकऱ्यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार मानले .
आज गुरुवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी मठ सरपंचा सौ. रुपाली अजित नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले . यावेळी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उमेश सावंत , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , मठ सोसायटी चेअरमन सुभाष बोवलेकर , उपसरपंच बंटी गावडे , मालवण किसान मोर्चाचे महेश सारंग व प्रसाद भोजणे , कुडाळ किसान मोर्चाचे वैभव शेणई , ग्रामपंचायत सदस्य संतोष वायंगणकर व शमिका धुरी , युवा मोर्चाचे प्रशांत बोवलेकर , माजी उपसरपंच महेश धुरी , स्वप्नील धुरी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते .

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा