You are currently viewing मठ येथील वेंगुर्ले सर्कलच्या तापमापन यंत्रचे उद्घाटन

मठ येथील वेंगुर्ले सर्कलच्या तापमापन यंत्रचे उद्घाटन

*शेतकऱ्यांनी मानले पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार*

 

वेंगुर्ले :

वेंगुर्ले सर्कल मधील वेदर स्टेशन (तापमापक यंत्र) हे पुर्वी तहसीलदार कार्यालय परिसरात होते. त्या परिसरात थिबक सिंचन ने फुलझाडांना पाणीपुरवठा होत असल्याने त्या भागात सातत्याने गारवा असल्याने उष्म हवामानाची नोंद होत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत होता. तापमान तंतोतंत मिळत नसल्याने गेली तीन – चार वर्षे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. शेतकरी शासनस्तरावर वारंवार पाठपुरावा करत होते, परंतु त्याला यश येत नव्हते.

भाजपाच्या किसान मोर्चा पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे यशस्वी पाठपुरावा करून वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण व वेंगुर्ले सर्कल मधील वेदर स्टेशन ची जागा बदलुन ३० नोव्हेंबर च्या आत योग्य ठिकाणी बसविण्यात आली. यामुळे वेंगुर्ले शहर, मठ, उभादांडा, आडारी, मोचेमाड या महसूली गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार मानले.

गुरुवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी मठ सरपंचा सौ. रुपाली अजित नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, मठ सोसायटी चेअरमन सुभाष बोवलेकर, उपसरपंच बंटी गावडे, मालवण किसान मोर्चाचे महेश सारंग व प्रसाद भोजणे, कुडाळ किसान मोर्चाचे वैभव शेणई, ग्रामपंचायत सदस्य संतोष वायंगणकर व शमिका धुरी, युवा मोर्चाचे प्रशांत बोवलेकर, माजी उपसरपंच महेश धुरी, स्वप्नील धुरी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा