You are currently viewing सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सावंत यांची मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती

सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सावंत यांची मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती

सावंतवाडी :

 

बांदा शहरातील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सावंत यांची मनसे सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.तसे पत्र मनसे अध्यक्ष ठाकरे यांनी दिले. मिलिंद यांनी २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला.

२०२४ ला होणार्या निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्ष बांधणीला सुरवात केली आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

मिलिंद सावंत यांनी सुरुवातीला बांदा उपशहर अध्यक्षपद, त्यानंतर बांदा विभाग अध्यक्ष म्हणून काम पाहीले. २०१० साली पक्ष प्रमुख राज ठाकरे यांना अटक झाली. त्यावेळी सावंतवाडी येथे मिलिंद यांनी पुढाकार घेत आंदोलन छेडले. त्यांना अटक करण्यात आले होते. डिंगणे, डोंगरपाल, डेगवे, इन्सुलि, निगुडे, पडवे, माजगाव, विलवडे, भालावल या मनसेची शाखेची स्थापन करण्यास मिलिंद यांची मोलाची भुमिका होती. तसेच बांदा दशकोटीतील लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या मार्गी लावल्या. यांची पक्षाने दखल घेत तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली असल्याचे मिलिंद सावंत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा