वेंगुर्ला :
सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसची आढावा बैठक गुरुवार दि. 30 नोव्हेंबर रोजी कुडाळ एमआयडीसी येथे घेण्यात आली. ही बैठक महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी एहसान खान, कोकण प्रभारी प्रभात झा, सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस प्रभारी जयदीप थोरात, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव सिद्धेश परब व जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष किरण टेंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कुडाळ एमआयडीसी येथे युवा काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये वेंगुर्ला तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्षपदी प्रथमेश उर्फ बंड्या परब यांची निवड करण्यात आली.
प्रथमेश उर्फ बंड्या परब हे शिरोडा ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले, पक्षाने आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे नक्कीच तालुक्यामध्ये युवकांची संघटना वाढीसाठी ते योगदान देतील. असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव सिध्देश परब यांनी व्यक्त केला यावेळी उपस्थित सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ युवक अध्यक्ष स्वप्नील परब, कुडाल मालवण विधानसभा अध्यक्ष मंदार शिरसाट, कणकवली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष दहिबावकर, देवगड तालुका अध्यक्ष सुरज घाडी, जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष गणेश पाडगावकर, कणकवली अध्यक्ष अनिकेत धहिबावकर, शिरोडा अध्यक्ष विशाल गावडे,युवक काँग्रेस आरवली अध्यक्ष प्रथमेश हूनारी, भाऊ गोडकर, ज्ञानोबा नार्वेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.