*शेतकऱ्यांना आंबा काजू पिक विमा भरण्यासाठी १५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ द्या- आ. वैभव नाईक*
*कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी*
सर्व्हर डाऊन असल्यामुळे ई पीक पाहणी अंतर्गत पिकांच्या नोंदी रखडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी बागायतदार हे आंबा काजू पिक विमा योजना २०२३-२४ चा लाभ घेऊ शकलेले नाहीत.तांत्रिक अडचणीमुळे पिक विम्याची कार्यवाही करण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बागायतदार यांना पिक विमा २०२३-२४ अंतर्गत पिक विमा भरण्यासाठी १५ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी आ. वैभव नाईक यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आ. वैभव नाईक यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, आंबा काजू पिक विमा (२०२३-२४) भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२३ ठेवण्यात आली आहे. मात्र सर्व्हर डाऊन असल्याने तांत्रिक अडचणीमुळे ई पीक पाहणी अंतर्गत पिकांच्या नोंदी रखडल्या आहेत. शेतकरी बागायतदार यांना पिक विमा भरण्यासाठी ई पीक पाहणीमध्ये पिकांची नोंद करणे आवश्यक असल्याने बहुतांश शेतकरी पिक विमा योजनेचा लाभ घेऊ शकलेले नाहीत. पिक विम्याची कार्यवाही करण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बागायतदार यांना पिक विमा २०२३-२४ अंतर्गत पिक विमा भरण्यासाठी १५ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी आ.वैभव नाईक यांनी केली आहे.
*संवाद मीडिया*
*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠*
*🏘️ A to Z बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*
*प्रोप्रा – राजू मानकर*
*संपर्क 👇*
*📲 मो.9422435601 | 9225784966 | 9561344739*
*💫चिरा, वाळू, खडी, स्टील, सिमेंट, विटा, डबर योग्य दरात मिळेल. काँक्रीट हाॅट मिक्सर, रोड रोलर, जे.सी.बी. जॅक, स्पॅन भाड्याने मिळेल*
*💫सेंट्रींग प्लेट मिळतील.*
*🚰बांधकामासाठी लागणारे पाणी कामावर पोच मिळेल.*
*💫🚗 🚚कार व टेम्पो भाड्याने मिळेल*
*🏡आर.सी.सी. व लोड बेअरींग बंगल्यांची कामे करून मिळतील.*
*🏬सना कॉम्प्लेक्स, आचरा रोड, पोस्ट ऑफिस समोर, कणकवली*
*☎️ ऑफिस*
*9604180156 / 7350288777*
*9225784966*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*