You are currently viewing फळ पीक विमा योजनेपासून एकही शेतकरी वंचित राहिल्यास गप्प बसणार नाही – रुपेश राऊळ

फळ पीक विमा योजनेपासून एकही शेतकरी वंचित राहिल्यास गप्प बसणार नाही – रुपेश राऊळ

*फळ पीक विमा योजनेपासून एकही शेतकरी वंचित राहिल्यास गप्प बसणार नाही – रुपेश राऊळ

सावंतवाडी

शेतकरी फळ पीक विमा योजनेची मुदत ही 30 नोव्हेंबर पर्यंतच आहे. अद्याप देखील तालुक्यातील अनेक शेतकरी हे योजनेपासून वंचित आहेत. एकही शेतकरी या योजनेपासून वंचित राहिला तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा उबाठा सेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज भेट देऊन कृषी विभागाचे अधिकारी युवराज भुईम्बर यांना दिला. श्री. राऊळ यांनी आज शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कृषी कार्यालयाला भेट देत माहिती घेतली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, तालुक्यातील शेतकरी फळ पिक विमा योजने पासून अनेक शेतकरी हे वंचित आहेत. त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे ही रक्कम तात्काळ जमा करावी, अशी मागणी उबाठा सेनेच्या वतीने रुपेश राऊळ यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. दरम्यान येत्या 28 पर्यंत ते पैसे जमा न झाल्यास 29 रोजी भव्य मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे त्यांनी आज पुन्हा एकदा भेट घेऊन आकडेवारीची माहिती घेतली.

परंतु अद्याप देखील अनेक शेतकरी हे फळ विमा योजने पासून वंचित आहेत. तसेच काही लोकांना फॉर्म भरण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे ही तांत्रिक अडचण दूर करून संबंधित शेतकऱ्यांना पैसे मिळावेत. जर 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत दिलेल्या शेतकऱ्यांना पैसे नाही मिळाले तर आपण गप्प बसणार नाही. तसेच आपण देखील शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी करावी, असे त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

यावेळी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे,पक्ष निरीक्षक अशोक परब,गुरुनाथ राऊळ,बाळू माळकर, पुरुषोत्तम राऊळ,प्रदीप सावंत,गजा सावंत आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा