उद्योजक व उमेदवारांनी सहभाग घ्यावा
– सहायक आयुक्त सुनिल पवार
सिंधुदुर्गनगरी
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत दिनांक 12 व 13 डिसेंबर 2020 रोजी Stat Leval ” MEGA JOB FAIR ” राज्यस्तरीय ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील उद्योजक व उमेदवारांनी ऑनलाईन सहभागी व्हावे, असे आवाहन, सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत राज्यातील तसेच जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन Stat Leval ” MEGA JOB FAIR ” चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर पंडित दिनदयाळ उपाध्याय स्टेट लेवल ” MEGA JOB FAIR ” मध्ये आपली रिक्तपदे अधिसूचित केली आहेत. यात आजपर्यंत राज्यातील 349 उद्योजकांनी बँकींग, फायनान्स इंश्युरन्स, इंडस्ट्री,सेक्युरिटी, सेल्समार्केटींग, इलेक्ट्रानिक्स, टेक्सटाईल, ऑटोमोबाईल, फिटर,टर्नर, इलेक्ट्रीशियन अशा विविध क्षेत्रातील 40 हजार रिक्तपदे अधिसूचित केलेली आहेत. जिल्ह्यातील नोकरी साधक (Job Seeker) उमेदवारांनी वरील पोर्टलवर आपल्या स्वत:च्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ऑनलाईन ॲप्लाई करावे. अधिक माहितीसाठी 0232- 228835, 9403350689 या क्रमांकावर अथवा ईमेल आयडी sindhudurgrojgar@gmail.com वर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.