जिल्ह्याच्या धरतीवर डीएड बेरोजगारांचा प्रश्न सोडविणार ;केंद्रीय मंत्री नारायण राणे
*डीएड बेरोजगार आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची केद्रीय मंत्री नारायण राणें सोबत झाली एकत्रित बैठक
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डीएड बेरोजगारांना नोकरी मिळावी. त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात हा आजच्या भेटीचा आणि बैठकीचा मुख्य मुद्दा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ज्या पद्धतीने निर्णय झाला आणि डीएड बेरोजगारांना नोकऱ्या देण्यात आल्या तसा निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यासंदर्भात आज शिक्षण मंत्री आणि डीएड बेरोजगार यांच्या समवेत चर्चा झाली. डीएड बेरोजगारांना न्याय देण्यासाठी आम्ही दोघेही प्रयत्न करत आहोत.शासन स्तरावरून तशा पद्धतीचे आदेश केले जाणार आहेत. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या डीएड बेरोजगार संघटना आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सोबतच्या बैठकीनंतर दिली.दरम्यान या डीएड विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यासंदर्भातही राज्यस्तरावर आम्ही विचार करत असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.