“वाचनमंदिरे समाजाला सुसंकृत बनवणारी जीवनसत्वे” – बाबा मुणगेकर
देवगड –
“विद्यामंदिरे माणसाला शिक्षित करतात. तर वाचन मंदिरे माणसाला सुसंस्कृतपणाचा धडे देतात. त्यामुळे ज्या गावात विद्या आणि वाचन ही सरस्वतीची दोन मंदिरे नांदत असतात त्या गावातील घरही खऱ्या अर्थाने नांदती घरे असतात. त्यामुळे तांबळडेग हे गाव नांदत्या घरांचं गाव आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये.” असे गौरवोद्गार सेवानिवृत्त शिक्षक, व्यासंगी लेखक बाबा मुणगेकर यांनी सागर मुक्तद्वार वाचनालय, तांबळडेग येथे ९४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरून उपस्थितांना संबोधताना काढले. प्रारंभी रश्मी रवींद्र कांदळगावकर यांच्या मधुर स्वरात स्वागतगीताने सुरुवात करण्यात आली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेला सन्माननीय व्यक्तीला सभेचे अध्यक्षपद देण्याची संस्थेची प्रथा आहे. त्यावेळी बाबा मुणगेकर पुढे म्हणाले, ” शाळेत विद्यार्थी आपल्या विद्यार्थी मित्रांसमवेत आणि गुरुजनांच्या उपस्थितीत शिक्षणाचे धडे घेत असतो. परंतु वाचन मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपण अनेक ग्रंथाच्या उपस्थितीत साहित्याचा आस्वाद घेत असतो. साहित्यमेळ्यात, ग्रंथमेळ्यात सहभागी झाल्याचं समाधान वाचकाला मिळत असतं .”
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिगंबर येरागी यांनी सभेच्या अध्यक्षांचा परिचय करून देत स्वागत केले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकर तथा दाजी राजम, गाबीत समाजाचे नेते सत्यवान तथा भाऊ सरवणकर, सल्लागार काका मुणगेकर, दिगंबर येरागी आदींनी आपलं मनोगत व्यक्त केले. संस्थेचे सचिव भाऊ सारंग, अंतर्गत हिशेब तपासनीस विष्णू धावडे, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर समितीचे अध्यक्ष गणपत सादये, सदस्य नरेंद्र राजम आदी प्रभृती उपस्थित होत्या. संस्थेचे अध्यक्ष दिगंबर येरागी यांच्या हस्ते बाबा मुणगेकर याना शाल व श्रीफळ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. अंतर्गत हिशेब तपासनीस विष्णू धावडे यांनी सूत्र संचालन व आभार व्यक्त केले.
संवाद मीडिया*
*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*
*💎एस.पी.बोअरवेल💎*
*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*
💁♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*
*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*
*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*
*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*
*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*
*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*