You are currently viewing काव्योत्सव, काव्यगीता आणि प्रेमांकुर बहरतांना या पुस्तकांचे प्रकाशन आणि कवी संमेलन संपन्न
  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

काव्योत्सव, काव्यगीता आणि प्रेमांकुर बहरतांना या पुस्तकांचे प्रकाशन आणि कवी संमेलन संपन्न

काव्योत्सव, काव्यगीता आणि प्रेमांकुर बहरतांना या पुस्तकांचे प्रकाशन आणि कवी संमेलन संपन्न

निगडी प्राधिकरण- (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर)

काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे या संस्थेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे आणि साईश इन्फोटेक अँड पब्लिकेशन्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित काव्योत्सव या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे, लेखिका वंदना ताम्हाणे लिखित काव्यगीता या ग्रंथाचे आणि लेखिका संगीता काळभोर लिखित प्रेमांकुर बहरतांना या पुस्तकांचे प्रकाशन शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी
निगडी पुणे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात संपन्न झाले.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आणि संतचित्रकार श्री वि. ग. सातपुते आप्पा हे लाभले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून समरसता साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष श्री अरविंद दोडे हे होते. ज्येष्ठ साहित्यिक श्री. तुकाराम पाटील, कविवर्य सतीश रानडे , कविवर्य आणि चित्रकार श्री शिवाजी सांगळे व काव्यानंद प्रतिष्ठान, पुणेचे उपाध्यक्ष व उद्योजक वैभव मोळक या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. परेश कोळी यांनी गणेश वंदना सादर केली तर कु.भाग्या खंडेलवाल हिने गुरुवंदना सादर केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे चे संस्थापक अध्यक्ष सुनिल खंडेलवाल यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा गांधी यांनी केले.
याप्रसंगी सर्व मान्यवरांचा व प्रकाशित लेखिकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवरांनी वेगवेगळ्या विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात बहारदार कवी संमेलन संपन्न झाले. ३३ कवी आणि कवयित्री यांनी कवी संमेलनात सहभाग घेत सुंदर सुंदर कविता सादर केल्या.
कार्यक्रमाची सांगता पसायदान गायनाने झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल शेळके, समीर मुल्ला, वंश खंडेलवाल आणि शंतनु सांगळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
या प्रसंगी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले रसिक प्रेक्षक आणि साहित्यिक उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा