You are currently viewing कोरोना लसीकरणाबाबत लोकप्रतिनीधी, अधिकाऱ्यांची बैठक घ्या

कोरोना लसीकरणाबाबत लोकप्रतिनीधी, अधिकाऱ्यांची बैठक घ्या

आमदार नितेश राणे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी

कणकवली

नुकत्याच केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर २०२० अखेर कोरोना या साथीच्या आजारावरील लस उपलब्ध होणार असून त्याचे देशात वितरण व सार्वजनिक रित्या लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. सदर लस ही शासकीय यंत्रणेमार्फत देण्यात येणार की अन्य मार्गाने मोहीम राबविणार याबाबत सर्वसामान्य जनता तसेच लोकप्रतिनिधी यांना अद्याप पर्यंत काहीही माहीती समजत नाही. सदर लसीकरण मोहीम नियोजनबद्ध रितीने राबविण्यासाठी व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा पातळीवर अद्यापपर्यंत पूर्व तयारी करण्यात आलेली आहे का? तसेच सदर मोहीमेचे निकष काय असणार यासंदर्भात जिल्हा स्तरावर लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक होणे गरजेचे आहे अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनामध्ये राणे यांनी म्हटले आहे, विविध राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यामध्ये यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हयाने महाराष्ट्रामध्ये प्रथम स्थान मिळविलेले आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण मोहीमही त्याच पद्धतीने राबवून सिंधुदुर्ग जिल्हयाची परंपरा कायम राखणे गरजेचे आहे. तरी याबाबत आपल्या स्तरावरून तातडीने बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी राणे यांनी केली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा