दोडामार्ग :
दोडामार्ग तालुक्यातील सर्वात मोठया आणि नुकतीच पंचवार्षिक निवडणूक झालेल्या साटेली भेडशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुमन डिंगणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत थेट सरपंच म्हणून छाया धर्णे निवडून आल्या आहेत. उपसरपंच पदासाठी शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी सुजित गायकवाड यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपसरपंच पदासाठी सुमन गणपत डिंगणेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुजित गायकवाड यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
यावेळी नवनिर्वाचित सर्व सदस्य राजन सावंत, गणपत डांगी, इस्माईल चांद, चंद्रकांत मयेकर, विष्णू सुतार यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. सरपंच, उपसरपंच व नवनिर्वाचित सदस्य यांचा साटेली देवस्थान समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी देवस्थान समिती अध्यक्ष सदानंद धर्णे, पांडुरंग धर्णे, सूर्यकांत धर्णे, पंकज गाड, बाबा मयेकर, गणपत डिंगणेकर, अमित गाड, ईसाक खेडेकर, शामसुंदर धर्णे आदी उपस्थित होते.