मालवण :
आचरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे संतोष मिराशी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अजय परब यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
नुतन उपसरपंचांचे सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी अभिनंदन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, योगेश गावकर, महेंद्र घाडी,पंकज आचरेकर,चद्रकांत कदम,किशोरी आचरेकर, हर्षदा पुजारे, श्रृती सावंत,सायली सारंग,सारीका तांडेल, अनुष्का गावकर, पुर्वा तारी यांसह भाजप कार्यकर्ते निलिमा सावंत,राजन गांवकर,जयप्रकाश परुळेकर, लवू मालंडकर,डॉक्टर प्रमोद कोळंबकर, पाडूरंग वायंगणकर,उदय घाडी,मंदार सरजोशी,निवडणूक निर्णय अधिकारी अजय परब ,ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम,ग्रामपंचायत प्रशासक विनायक जाधव,तलाठी संतोष जाधव यांसह अन्यमान्यवर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी सहकारी, विरोधक सदस्यांना एकत्रच घेऊन गाव विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.