You are currently viewing २६ नोव्हेंबर रोजी मातोंड श्री देवी सातेरी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव

२६ नोव्हेंबर रोजी मातोंड श्री देवी सातेरी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव

वेंगुर्ला :

 

मातोंड येथील स्वयंभू व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देवी सातेरी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे . यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . ही जत्रा लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे . मातोंड गावच्या सातेरी देवस्थानचा जागृत देवस्थान म्हणून नावलौकिक आहे . श्री देवी सातेरीचा जत्रोत्सव कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला होतो . जत्रोत्सवा दिवशी सकाळपासून ओट्या भरणे , नवस फेडणे , आदी कार्यक्रम होतात. रात्री ८ वाजता सवाद्य देवीच्या उत्सव मूर्तीचे मंदिरात आगमन , त्यानंतर रात्री ११ वाजता मंदिर परिसरात दीपोत्सव , सवाद्य पालखी सोहळा तसेच इतर धार्मिक कार्यक्रम होतात. रात्री १ वाजता गावातील दशावतारी नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे . त्याचप्रमाणे हजारो निर्जळी उपवास करून रात्री मंदिराभोवती लोटांगण घालून नवस पूर्ण करतात . त्यामुळे ही जत्रा लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे . त्याचप्रमाणे मंदिराभोवतालची विद्युत रोषणाई खास आकर्षण ठरते . या जत्रेसाठी मुंबई , गोवा व कर्नाटक भागातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात . तरी या जत्रोत्सवाला भाविकांनी देवीच्या दर्शनाचा भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन मातोंड गावकर मंडळी , व देवस्थान कमिटी मातोंड यांनी केले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा