*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*प्रसन्नता मनाची*
*“ती नेहमीच हसतमुख असते. तिच्या नुसत्या अस्तित्वानेच सभोवतालचं वातावरण क्षणात चैतन्यमय होऊन जातं!”*
किती खरं आहे हे! प्रसन्नता आणि चैतन्य या भाववाचक नामांचं अतूट नातं आहे. प्रसन्न व्यक्ती ही स्वतःही चैतन्य युक्त असते आणि ती तिच्या सहवासातल्या इतरांचंही जगणं सुंदर बनवते.
जगात सर्व सुखी असा कोण आहे?
जबाबदारी, संकटे, प्रश्न, समस्या फक्त आपल्याच वाट्यला आल्यात का? अजिबात नाही. जीवनातील चढ-उतार, संत महात्म्यांनाही चुकलेले नाहीत. त्यात सामान्य माणसाची काय गत?
मनात सांभाळलेलं दुःख सहजपणे चर्येवर उमटतं आणि अशी व्यक्ती कायम दुर्मुखलेली असते. उदासीन नैराश्य दुःख ,चिंता यातच गढलेली असते. दु:खी मन म्हणजे नरका समान. वास्तविक जीवन हे मृगजळा समान आहे. म्हणूनच सतत दडपणाखाली, अडचणींच्या ओझ्याखाली मन मारून जगण्यापेक्षा समस्यांवर तोडगा काढत जीवनाला हसत सामोरे जाणे यातच सकारात्मक मनाची प्रसन्नता टिकवणे अभिप्रेत आहे.
मनाची प्रसन्नता म्हणजेच जीवन जगण्याची परम शक्ती आहे. कधीतरी अंतरात डोकावून बघा बरं! दररोजच्या, धकाधकीच्या जीवनात इतके गुरफटून गेलोय की आपण मनमोकळेपणाने हसणंही विसरून गेलो आहोत.
*लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन*
*हसा आणि लठ्ठ व्हा*
यातला गर्भितार्थ हाच आहे की मनाच्या प्रसन्नतेत असते आरोग्य. मनाचे आणि देहाचेही. प्रसन्न मनाची शक्ती प्रचंड आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या यशाचे गमक म्हणजे मनाची प्रसन्नता. जे मन प्रसन्न असते तेच कार्यक्षम असते. लढण्याची शक्ती ते देते. प्रसन्न मन म्हणजे उर्जितावस्था. ते प्रयोगशील असतं. नवनव्या कार्यबाहुल्यात स्वतःला झोकून देण्यास ते प्रवृत्त करतं. निराशेत गलित गात्रता असते, नकारात्मकता असते. पण प्रसन्नते ऊर्जा असते, विचारांना प्रेरणा,कार्यक्षमता असते.
संत एकनाथ महाराज म्हणतात,
*मन मनासि होय प्रसन्न ।*
*तेव्हां वृत्ती होय निरभिमान।।*
मनाच्या प्रसन्नतेत विकार नसतात. गर्व, अहंकार मीपणापासून ते दूर असतं. जग सुंदर आहे ही भावना असते. आनंदाचे डोही आनंद तरंग ही अनुभूती असते.
केशवसुतांच्या *सतारीचे बोल* या कवितेत विमनस्क मनाची स्थिती आणि त्यानंतरची उपरती याचं सुंदर वर्णन आहे.
*काळोखाची रजनी होती*
*हृदयी भरल्या होत्या खंती*
*अंधारातची घडले सारे*
*लक्ष्य न लक्षी वरचे तारे …*
पण मग अशा या विमनस्तकतेवर मात करण्यासारखं काहीतरी घडतं आणि..
*दिक्कालासह अतित झालो*
*उगमी विलयी अनंत उरलो*
*विसरोनि गेलो अखिल भेदा*
*ऐकत असता दिडदा-दिडदा*
त्या नंतर
*शांतच वारे शांतच तारे*
*शांतच हृदयी झाले सारे*
मनाची प्रसन्नता साध्य झाली की मग आतला काळोख विरू लागतो आणि मन शांत व स्थिर होते. निसर्गाच्या सानिध्यात, नृत्य, साहित्य, संगीताच्या विश्वात, मनाची प्रसन्नता साध्य होते. सत्संगातही मनाची प्रसन्नता आहे. स्वच्छता, नीटनेटकेपणा, साधेपणा, यातही प्रसन्नता आहे. ही सारीच मनावरची जळमटं दूर करणारी साधनं आहेत. पर्वताच्या स्तब्धतेत, प्रपाताच्या खळखळण्यात, समुद्राच्या संथ लाटांमध्ये, आकाशाच्या निळाईत, पहाटेच्या सूर्यकिरणात, पक्षांच्या किलबिलाटात, इतकंच नव्हे तर बाळ बोबड्या शब्दात, छुमछुमणार्या पैंजणात, बांगड्यांच्या मधुर किणकिणाटात सुद्धा ही प्रसन्नता दाटलेली आहे. फक्त मनातले सप्तसूर या साऱ्यांशी जुळायला हवेत. असे सुरमयी मनच प्रसन्न असते आणि जीवनातली समस्त बेसुरता आणि भेसुरता ती नाहीशी करते.
म्हणूनच संत तुकाराम म्हणतात,
*मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे कारण*।।
*राधिका भांडारकर पुणे*
*संवाद मिडिया*
*💥ऑफर.. ऑफर…💥 दसऱ्यानिम्मित प्रभू कृषि सेवा केंद्र कुडाळकडून भव्य ऑफर..💥*
*Advt Link👇*
————————————————–
💥 *ऑफर…🥳 ऑफर…🥳 ऑफर…💥*
🍃 *!! विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!🍃*
💥 *प्रभू कृषि सेवा केंद्र, कुडाळकडून दसऱ्यानिम्मित भव्य ऑफर.. 😇💥*
▪️बॅटरी स्टार्ट ग्रास कटर
▪️चैन स्वा
▪️बॅटरी पंप
▪️वॉटर पंप
▪️पॉवर स्प्रेअर्स
👉 खरेदी वर 50% पर्यंत सूट💥
👉 आजच भेट द्या…🚶♂️
👉 *टीप : शासकीय अनुदानास सदर स्कीम लागू होणार नाही. नियम आणि अटी लागू*
🎴 *मे. प्रभू कृषि सेवा केंद्र, उदयमनगर, भोगटे कंपाऊंड कुडाळ*
📱 *संपर्क : 9423304173 / 7263832399*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*