*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवयित्री डॉ.गौरी एदलाबादकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*खगोल सृष्टी*
शाळेत असताना माझा
विषय नावडता भूगोल,
किती करावा लागे
त्याचा अभ्यास सखोल!
ग्रह तारेंना नाही काम
करती नुसती फिरफिर,
अन् आमच्यामागे उगा
लावतात की किरकिर!
म्हणतात शनी भोवती
आहे गोल कडे,
नाही प्रत्यक्ष, दुर्बिणीतून
तरी दाखवा की गडे !
चंद्राचा तर नाहीच
मुळी भरवसा,
नित्य बदले रूप/कला
विश्वास ठेवावा कसा?
अशा कितीतरी म्हणे
आहेत सुर्यमाला,
किती कौतुक सुर्याचे
जरी फेकतो ज्वाला!
नक्षत्रांना कशाला
नावं ठेवता उगाचच!
लक्षात ठेवायचा
आम्हा नाहक त्रासच!
तारा निखळता
उल्कापात पृथ्वीवर,
आदळून मोठे
पाडतात की विवर!
कशाला हे ब्रह्मांड
आपण शिकायचे,
आपल्या घरी, पृथ्वीवरच
त्यापेक्षा लक्ष द्यायचे!
शास्त्रज्ञच करू देत
त्यांचा अभ्यास,
आम्हांला काय, कितीही
असू दे त्यांचा व्यास!
रात्री फक्त पहावा
त्यांचा चमचमाट,
कविता तेवढ्या करायचा
घालावा आपण घाट!
डॅा गौरी एदलाबादकर
Nice