कुडाळ :
नारूर येथील श्री देवी महालक्ष्मी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निमित्त २६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी दि. २६ रोजी स. ६.०० वा. सामुदायिक प्रार्थना, स. ६.३० वा. लघ रुद्राभिषेक, स. ८.०० वा. उपदैवत पूजा, स. ९.०० वा. सालंकृत महापूजा, ओट्या भरणे, नवस फेडणे, नवस बोलणे, दु. १२.३० वा. महानैवेद्य, दु. १.०० वा. महाआरती, १.३० वा. महाप्रसाद, सायं. ६.०० वा. उपदैवतांना दीपदान, सायं. ७.०० वा. त्रिपुरवाती पेटवणे, सायं. ७.३० वा. पुराण व आरती, रात्रौ ११.०० वा. पालखी सोहळा, रात्रौ १२.०० वा. वालावलकर दशावतार नाट्य प्रयोग.
सोमवार दि. २७ नोव्हेंबर रोजी स. ८.०० वाजल्यापासून भक्तमंडळी करवी श्री देवी महालक्ष्मीस अभिषेक, स. ९.०० वा. सालंकृत पूजा, दु. १ वा.महानैवेद्य आरती, दु. ३.०० वा. गोपाळकाला कीर्तन पारंपारिक कार्यक्रम, सायं. ५ वा. देवतळी येथे देवता स्थानासाठी प्रयाण, सायं. ६.०० वा. वार्षिक उपदैवत भेट कार्यक्रम, रात्रौ ११.०० वा. लळित अक्षतारुपी महाप्रसाद
मंगळवार दि. २८ रोजी स. ८ वा. पासून अभिषेक, सालंकृत महापूजा, दु. १२.०० वा . महानैवेद्य, महाआरती कार्यक्रम, दु. १.०० वा. महाप्रसाद, सायं. ४ वा. सांगता व आशीर्वादरुपी गाऱ्हाणे असे कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देवी महालक्ष्मी देवस्थान स्थानिक सल्लागार व उपसमिती नारुर, महालक्ष्मी देवस्थानचे मानकरी, बहुमानकरी व नारूर ग्रामस्थ मंडळ यांनी केले आहे.