You are currently viewing गझलपुष्प कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक संस्थेचा पाचवा वर्धापनदिन

गझलपुष्प कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक संस्थेचा पाचवा वर्धापनदिन

*गझलपुष्प कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक संस्थेचा पाचवा वर्धापनदिन*

पिंपरी,

गेली पाच वर्षे पिंपरी चिंचवड मध्ये मराठी गझलेच्या प्रचार व प्रसारासाठी सातत्याने कार्य करीत असलेल्या गझलपुष्प कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक, संस्थेचा पाचवा वर्धापनदिन रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९:३० ते सायंकाळी ६:३० ह्यावेळेत संपन्न होणार आहे. अल्पावधीतच महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळालेल्या गझलपुष्प संस्थेचा वर्धापनदिन हा एक महत्त्वाचा समारंभ असतो. संस्थांमार्फत *गझल प्रचार व प्रसार पुरस्कार* सुप्रसिद्ध गझलकार मा. डॉ शिवाजी काळे (रा.राशीन) ह्यांना सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे. तसेच सर्वप्रथम ज्यांनी मराठी गझल स्वरबद्ध करून सादर केली ते सुप्रसिद्ध गझल गायक, संगीतकार ‘गझलगंधर्व’ श्री. सुधाकर कदम सर यांच्यांशी मुलाखतीतून ‘सूर-संवाद’ हितगूज, सुप्रसिद्ध गझलकार अभिजीत काळे यांच्या “मनाचा गूढ गाभारा” या पहिल्या गझलसंग्रहाचे प्रकाशन, गझलपुष्प गझल लेखन स्पर्धा पुरस्कार वितरण आणि तीन राज्यस्तरीय गझल मुशायरे संपन्न होणार आहेत. या सोहळ्याला उद्घाटक म्हणून युवानेते मा. विश्वजीत दादा बारणे, उद्योजक मा. राहुल पांचाल, उद्योजक मा. विलास शिंदे, उद्योजक मा. संजय चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक मा. अभय पोकर्णा, सामाजिक कार्यकर्त्या मा. वैभवी सुर्वे उपस्थित राहणार आहेत. तसेच ह्या सोहळ्याला सुप्रसिद्ध गझलकार प्रमोद खराडे, डॉ स्नेहल कुलकर्णी, शाम खामकर, शिव डोईजोडे, अमोल शिरसाट, आत्माराम जाधव, सारंग पांपटवार असे राज्यभरातील गझलकार उपस्थित राहणार आहेत. तसेच पिंपरी चिंचवड साहित्य वर्तुळातील श्रीकांत चौगुले, सुरेश कंक, रमेश वाकनिस, धनंजय भिसे, सविता इंगळे, शोभा जोशी, उज्ज्वला केळकर, राजेंद्र घावटे आदी उपस्थित राहणार आहेत. रसिकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा.

– नंदकुमार मुरडे
९९७०१९०८६१

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा