गोवा बनावटीच्या दारूचे मुख्य विक्री केंद्र म्हणजे दारूचा गोंधळ घालणाऱ्या एका अवैद्य दारू व्यवसायिकाचे मांगल्याचे दीप लावणारे परमिट रूम. नव्यानेच राजकीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या महाभारतातील ^संजय^ च्या परमिट रूममध्ये नारळाची दारू सुद्धा भेटते. गोवा बनावटीच्या दारूची तर सर्रास विक्री होत असते. महाराष्ट्राची दारू शोकेस मध्ये लावून देखावा निर्माण करायचा आणि नेहमीच्या गिर्हाईकास मात्र सराईतपणे गोवा बनावटीची दारू द्यायची, ही तर या संजय ची खुबीच.
नवखे गिर्हाईक वगळता रोजच्या तळीरामांना नारळाची किंवा गोवा बनावटीची दारूच देण्याची याची कामगारांना अटच आहे. कॅशिअरच्या पायाजवळ काउंटर खाली गोवा बनावटीच्या दारूचे दोन बॉक्स ठेवलेलेच असतात, आणि शोकेस मध्ये मात्र महाराष्ट्राची दारू. एखाद्यावेळेस पायाखालची दारू संपली तर लगेच हा ^संजय^ किंवा ट्युलिप दारूचा स्टॉक आणून देतात. नियमित येणाऱ्यांना गोवाच द्या, अनोळख्याना मात्र नको अशी कामगारांना सुचनाच असते.
असा हा सावळा गोंधळ मांगल्याचे दीप मध्ये नेहमीच सुरू असतो. एकदा कोल्हापूर येथील राज्य उत्पादन शुल्क खात्याचा अधिकारी ^संजय^ च्या मांगल्याचे दीप मध्ये आला. त्याला तिथे गोवा बनावटीची दारू सापडली……
काउंटर वरील मॅनेजर ने तात्काळ या महाभारताच्या संजय ला फोन फिरवला. संजय ला वृत्तांत समजताच तो मॅनेजर वर वैतागला…. तू का गोवा बॉटल त्याला दाखवली? अशी विचारणा केली, आणि काही वेळातच ^संजय^ राजाच्या भूमिकेत मांगल्याचे दीप मध्ये अवतरला. मांडवली करण्यात ^संजय^ चा हातखंडा…. राज्य उत्पादन शुल्क च्या अधिकाऱ्यासोबत मांडवली करून प्रकरण दाबून टाकले.
अधिकारी गेल्यावर मॅनेजर ^संजय^ ला बोलला, “तुम्ही आम्हाला अडचणीत आणणार.”
मॅनेजरच्या या वाक्यावर मात्र धूर्त ^संजय^ उत्तरला…. श्रीमंत होण्यासाठी असे करावेच लागते. दुसऱ्या दिवशी सर्वकाही तसंच चाललं होतं, गोवा बनावटीची दारू कॅशिअरच्या पायाखालीच होती, त्यात कोणताही बदल झाला नव्हता, फक्त बदलला होता तो कॅशिअर…..
आणि जुना कॅशिअर जाऊन त्याच्या जागी दारू विक्री करण्यासाठी आला होता तो दूध विक्री करणारा गवळी….
अवैद्य दारू धंद्यांमध्ये पैशांच्या आशेपोटी माणसे भरपूर भेटतात…परंतु भेसळयुक्त दारू पिऊन मरणारी माणसे मात्र पुन्हा भेटत नाहीत.