You are currently viewing सखी निवास कार्यान्वित करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत

सखी निवास कार्यान्वित करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत

सखी निवास कार्यान्वित करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात सखी निवास योजना राबविण्यास इच्छुक संस्था/एजन्सी यांनी विहित वेळेत प्रस्ताव सादर करावेत तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे प्रत्यक्ष अथवा कार्यालयाच्या ०२३६२-२२८८६९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित व सोयीच्या पध्दतीने निवासाच्या व्यवस्थेकरिता मिशन शक्ती अंतर्गत सखी निवास या योजनेचा समावेश आहे. राज्यात सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या नोकरी करणाऱ्या महिलांच्या वसतिगृहांव्यतिरिक्त  आणखी नवीन ५० सखी निवास आहेत. भाडे तत्वावरील इमारती मध्ये प्रशासकीय खर्च, इमारत भाडे, पाळणा व्यवस्थापन याकरिता अनुदानासह कार्यान्वित करावयाची आहेत. महिला व बालविकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून ०३.०६.२०२३ रोजी सर्व जिल्ह्यातील आघाडीच्या वर्तमानपत्रांत प्रसिध्द जाहिरातीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १ सखी निवास कार्यान्वित करायचे आहे. जिल्ह्यातील नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या शहरामध्ये सुरक्षित व सोईस्कर निवासाची व्यवस्था होण्यासाठी भाडे तत्वावरील  इमारतीमध्ये  सखी निवास कार्यान्वित करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार विहित पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

या योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक असलेली सविस्तर माहिती, योजनेचे निकष, शासन निर्णय, अर्जाना नमूना, अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे, इमारतीचे निकष इ. सर्व माहिती महिला बाल विकास आयुक्तालयाच्या https://www.wcdcommpune.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर निकषानुसार केंद्र शासन पुरस्कृत सख्री निवास योजना कार्यान्वित करून याविषयी राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्मित होणारे शासन निर्णय व सूचना यानुसार योजना राबविण्यास इच्छुक असलेल्या संस्था व एजन्सी यांच्याकडून दि. ३० जून २०२३ रोजी दुपारी २.०० वाजेपर्यंत सादर करणे बाबत कळविणेत आले होते. परंतु उप आयुक्त, महिला व बालविकास विभाग यांचेकडील पत्रानुसार पुनश्चः प्रस्ताव मागविण्यासाठी स्थानिक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देणे बाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार इच्छुक असलेल्या संस्था / एजन्सी यांनी दि.30 नोव्हेंबर 2023 पर्यंत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, ए-ब्लॉक, तळमजला, ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे एकूण ५ प्रतींमध्ये पृष्ठ क्रमांक नमूद करून प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. तसेच प्रस्ताव हे विहित नमुन्यात व त्यातील सर्व रकान्यामधील माहिती भरून तसेच आवश्यक ते कागदपत्रे/प्रमाणपत्रे सोबत जोडूनच सादर करण्यात यावेत.

प्रस्ताव सादर करताना इमारत मालकासोबत केलेला करारनामा नोटरी स्वरुपात असला तरी चालेल परंतु संस्थेस योजना राबविण्यास मान्यता मिळाल्यास मान्यता मिळाल्याच्या दिवसापासून ३० दिवसाच्या आत नोंदणीकृत भाडे करारनामा सादर करणे आवश्यक राहील. सदरच्या मुदती नंतर आलेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. स्वयंसेवी संस्था कडून सदर योजनेकरीता प्रस्ताव प्राप्त न झाल्यास या विभागा मार्फत शासकीय अथवा भाडेतत्वावर इमारत घेऊन प्रस्ताव सादर करण्यात येईल.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा