You are currently viewing २३ नोव्हेंबरला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग व रत्नागिरी दौऱ्यावर

२३ नोव्हेंबरला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग व रत्नागिरी दौऱ्यावर

कणकवली :

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे गुरुवार दि. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत.

२३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वा. खळा बैठक – श्रीम. लीना कुबल यांचे घर, दोडामार्ग (दोडामार्ग तालुका), सकाळी ११.३० वा. दोडामार्ग ते सावंतवाडी, दुपारी १२.२५ वा. खळा बैठक – श्री. चंद्रकांत कासार यांचे घर, सावंतवाडी (सावंतवाडी, वेंगुर्ला तालुका), दुपारी ०१.०० वा. सावंतवाडी ते कुडाळ, दुपारी ०१.३० वा. भेट – श्री. मंदार शिरसाट यांचे घर, कुडाळ, दुपारी ०१.४० वा. कुडाळ ते बांबार्डे, खळा बैठक – श्रीम. स्नेहा दळवी यांचे घर, बांबार्डे (कुडाळ, मालवण तालुका), दुपारी ०२.२० वा. बांबार्डे ते कणकवली, दुपारी ०३.०० वा. खळा बैठक व पत्रकार परिषद सतिश सावंत यांचे घर, कणकवली (वैभववाडी, देवगड तालुका) सायं.०४.०० वा. कणकवली ते राजापूर खळा बैठक – श्री. प्रफुल लांजेकर यांचे घर, रत्नागिरी -राजापूर (राजापूर तालुका) दौऱ्यावर आदित्य ठाकरे आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − four =