You are currently viewing आत्महत्या—भाग १

आत्महत्या—भाग १

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सदस्य वैद्यराज कविवर्य भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*आत्महत्या—भाग १*

 

आत्महत्या . चुकीच्या कृतीला दिलेलं सुंदर नाव *आत्महत्या* . आत्महत्या हा प्रकार मला माझ्या वयाच्या दहाव्या वर्षापासून परिचीत आहे .

एक माझ्या वडिलांचा विद्यार्थी होता . तो एके रात्री वडिलांना भेटायला आला . मी दरवाजा उघडला . ये म्हणून म्हटले . त्याने दरवाजातूनच विचारले , सर आहेत ? मी म्हटले , नासिक गेलेत . तो निघून गेला . दुसर्‍या दिवशी बातमी त्याने आत्महत्या केल्याची ! मी नऊ वर्षाचा होतो तेंव्हा . पण त्या चर्चेसोबत दुसरीही चर्चा कानावर येत होती , माझ्या वडिलांनी त्याला दोन वेळा परावृत्त केले होते आत्महत्येपासून !! वडिलांचे शिक्षक म्हणून चांगले नाव निघत असतांनाचा माझा आनंद वेगळा होता . आणि मी वैद्य झाल्यावर या समस्येवरचं औषध ज्ञात असल्याचा दुसरा आनंद !!!! पण हे प्रकरण वेगळं आहे ! ते पूर्णांशाने कळायला हवं प्रत्येकालाच !!

आता मी का त्याला ” सुंदर नाव ” म्हटलं ? हा पहिला प्रश्न पडतो ना ? त्यावर प्रथम मी एक प्रश्न अपणास विचारतो . आत्महत्या शब्दासारखा दुसरा शब्द कोणता ? तो कृपया सांगता येईल आपल्याला ? नाही ना ? मी सांगतो , ” आत्मघात !! ” . आता तुम्ही म्हणाल , आत्मघात वेगळा आहे ?? अजून एक प्रश्न . ज्या आत्मघातात सर्वनाश होतो तो !! बरं जावू द्या . ज्या आत्मघातात आत्म्याचा सर्वनाश होतो , म्हणूनच त्याला आत्मघात म्हणतात ना ?? उदा. म्हणून पुन्हा प्रश्नच विचारतो , महाराष्ट्रात हिदूत्व मुद्यावर जन्माला आलेल्या शिवसेनेने केलेली तडजोड ही आत्मघातीच ना !! यात आत्मा सप्राण असून गतप्राण झाल्यागत वावरत असतो . पण सुसाईड बाॅम्बर हा आत्मघाती नसतो ?? तुम्ही ज्यावेळेस गतप्राण होतात ! , तेंव्हा किती जणांची मने मारतात ? किती जणांची मने दुखावतात ? जाणीव आहे ??आपला काही एक संबंध नसतांना फक्त कानांनी ऐकलं तरी काहींना वाईटच वाटतं ! अपराधी वाटतं ! ती आत्महत्या हा न्याय आहे , हे आत्महत्या करणाराला वाटणं — ही चूक नाही ? काहींना तर ती बातमी ऐकताच मेल्याहून मेल्यासारखं होतं की , मी जगाला काय उत्तर देवू वा काय सांगू त्या आत्महत्येबद्दल ??!! ती आत्महत्या न्याय्यी कशी असू शकेल ?? जर आत्मघात न्याय्यी नाही तशी आत्महत्या हा ही न्याय नाही .

इत्यलम् ।

उर्वरीत उद्या . 🌹🌹

🙏🙏 🙏🙏

©लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

 

 

🌹🌹🙏🙏आत्महत्या — २ 🙏🙏🌹🌹

 

*आत्महत्या आणि आत्मघात* या दोनही शब्दांमधे ” आत्म ” म्हणजे ” स्व ” हा शब्द समान आहे . तसं पहायला गेलं तर स्व ची हत्या वा स्व चा घात हा जिवंत असतांनासुद्धा होतोच की !! माणूस सकाळी उठला व त्याला विचारले की तुझं नाव काय ? तर तो सांगतो , ” मी अमुक अमुक ” , ” हे माझं आहे ” , माझ्याजवळ ह्या गोष्टी आहेत ” , ” मी इतका मोठा आहे ” , हा सगळा ” स्व ” च आहे माणसाचा ! असं वाटत नाही ? ” आत्म ” , ” स्व ” वा “मी ” हे समानच आहेत !! मेलेला माणूस ” हे माझं , मी अमुक अमुक , मी इतका मोठा वा अन्य ” सांगू शकतो ? नाही ! मग जिवंत माणूस जर अभिमानाने हे सांगू शकला नाही तर तो मृतप्राय होवूनच जगतो का नाही ? म्हणजेच हीनता , दीनता , लाचारी , नामर्दता , मागत जगणं , ही लक्षणे घेवून जगणे म्हणजे आत्मघातीपणा वा आत्महत्या नाही वाटत आपणास ?? माणसाचं खर्‍या अर्थाने जिवंत असणं , हे ज्या गोष्टींवर अवलंबून असतं , ते सद्गुण संच नसतील तर तो मृतप्रायच ! किंबहुना तो ह्या गोष्टींसह जगत असेल तर तो आत्मघातच करतो वा आत्महत्याच करतो !! क्षुद्र म्हणजे हलक्या गुणसंचासह जगणं ही आत्महत्याच आहे ! हा झाला दुसरा भाग .

अजून एक गोष्ट पण माझ्या मनाला पडलेला महत्वाचा पडलेला प्रश्न . *देशाचे राष्ट्रपति पद हे सर्वोच्च पद असतांना त्याची निवडणूक ” दलित ” या शब्दावर जर लढवली जात असेल व समाजावर राज्य करणारे आमदार — खासदार ” दलित वा आरक्षित ” म्हणून डिंगा मिरवत असतील आणि त्यांचे समाज बांधव ” आमचे ” म्हणून गर्वाने मिरवित असतील तर तो देशच मेलेल्या माणसांचा आहे का ? , हा सहज म्हणून पडलेला प्रश्न . मग त्या देशाच्या मानसिकतेवर शाहीनबाग सहज राज्य करु शकेल ! व ते दिल्लीमुळे सिद्धच झालं !!!!! आम्ही हीन , दीन , लाचार , भिकारी , आम्हाला फुकटच पाहिजे !!??!!?? सगळा समाजच आत्मघाती वा आत्महत्या केलेला !!!!!! असो .

आपण पुन्हा ” माणसांनी करत असलेल्या आत्महत्येवर म्हणजे तथाकथित मृत्युवर चर्चा सुरु करु .

इत्यलम् । उर्वरीत उद्या । 🌹🌹

🙏🙏 🙏🙏

©लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

 

 

*संवाद मिडिया*

 

*”शिवतेज” रो बंगलो भव्य प्रकल्प..🏘️🏘️*

 

*Advt Link👇*

————————————————-

*🏮दिवाळीच्या मुहुर्तावर🏮 🛣️ सावंतवाडी शहरात_ 🏘️ *अजिंक्य कन्स्ट्रक्शन* 🏘️ यांच्या 💫 *”शिवतेज”* 💫 *रो बंगलोच्या भव्य प्रकल्पात* आजच आपल्या बंगल्याचे स्वप्न साकार करा..😇

 

🏘️🏘️ *शिवतेज* 🏘️🏘️

 

👉 *रेरा क्रमांक – P52900053094*

 

👉 शिल्पग्राम पासून फक्त 400 मीटर अंतरावर चऱ्हाठे ग्रामपंचायत हद्दीत..😇

 

👉 रो बंगलो चा भव्य प्रकल्प🏘️

 

👉 डांबरी रस्ते🛣️

 

👉 आकर्षक इलेव्हेशन

 

👉 निसर्गरम्य परिसर🏡

 

👉 प्रत्येक बंगल्याच्या मागे व पुढच्या बाजूला मोकळी जागा 🏕️

 

👉 आजच बुक करा.. 📝

 

*👉संपर्क करा..!!📱*

 

*बिल्डर्स श्री. संजय सावंत*

9422381608 / 7276300298 / 8411066704

 

🎴पत्ता : अजिंक्य, श्रमविहार कॉलनी, जेलमागे, सावंतवाडी

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + six =