चिवला बीच येथे १६ व १७ डिसेंबरला राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा…
मालवण
सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना व मालवण पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण चिवला बीचवर दि. १६ व १७ डिसेंबर रोजी १३ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष दीपक परब, सचिव राजेंद्र पालकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
मालवण नगरपालिका येथे आयोजित पत्रकार परिषदेस सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष दीपक परब, सचिव राजेंद्र पालकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे, अरुण जगताप, नीलकंठ अखाडे, युसुफ चुडेसरा, नील लब्दे, सुधीर साळसकर, गुरु राणे, आदी उपस्थित होते.
यावर्षी १६ व १७ डिसेंबर रोजी चिवला बीच येथे होणारी तेरावी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा ही संपूर्ण भारतातील विशेष अशी स्पर्धा असून या स्पर्धेत ६ वयापासून ते ७५ वयाहून अधिक स्पर्धक भाग घेत असलेली हि भारतातील एकमेव स्पर्धा असून या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे गतवर्षीप्रमाणे यावर्षीही दिव्यांग जलतरणपटू साठी एका वेगळ्या गटाचे आयोजन करण्यात आले आहे. तर यावर्षी या स्पर्धेत महाराष्ट्रातील प्रथनच १० कि.मी. सागरी जलतरण स्पर्धा व देशातील पहिली फिंस सागरी जलतरण स्पर्धा होणार आहे. स्पर्धकांची नोंदणी १५ व १६ डिसेंबर रोजी नगरपालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृह येथे करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी १६ तारखेला एक किलोमीटर, दोन किलोमीटर, तीन किलोमीटर, पाच किलोमीटर या सर्व ग्रुप ची स्पर्धा होणार असून १७ डिसेंबर रोजी पाचशे मीटर, दहा किलोमीटर, एक किलोमीटर, दोन किलोमीटर फिन्स सागरी जलतरण तसेच दिव्यांग जलतरणपटूंची स्पर्धा होणार आहे. त्याची नोंदणी मामा वरेरकर नाट्यगृह येथे होणार आहे. तसेच स्थानिक मालवण वासीयांसाठी १५ डिसेंबर रोजी बीच कबड्डी व नौकानयन स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी राजेंद्र पालकर यांनी दिली.
स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धेचे मेडल, सहभाग प्रमाणपत्र व टी-शर्ट देण्यात येणार आहे तसेच ग्रुपमध्ये पहिल्या दहा विजेत्याला प्रथम, द्वितीय व तृतीय यांना मेडल, रोख बक्षीस, टी-शर्ट, प्रमाणपत्र, नॅपकिन, बॅग, वॉटरबॉटल इत्यादी वस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. २००९ रोजी पहिल्या स्पर्धेत २५३ स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यानंतर यात स्पर्धकांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. गेल्या बारा वर्षात एकूण बारा हजार स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण होती. या स्पर्धेच्या निमित्ताने तालुक्यातील पर्यटनालाही चालना मिळाली असून स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे, असेही राजेंद्र पालकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गेली १३ वर्ष ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धा आयोजनासाठी मालवण नगरपालिकेने मोलाची मदत केली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य प्रशासनाचे सर्व विभाग सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक मालवणवासीय त्याचबरोबर माजी नगरसेवक, आमदार व खासदार यांचेही मोलाचे सहकार्य मिळत आहे. स्थानिकांकडूनही स्पर्धकाचे योग्यरीतीने आदरातिथ्य केले जात आहे. दिव्यांग /अपंग जलतरणपटूना विशेष सहाय्य व प्रोत्साहन दिले जात आहे, असे अध्यक्ष दीपक परब यांनी सांगितले.
स्पर्धक नावनोंदणी तसेच स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष बाबा परब व निल लब्दे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
*संवाद मीडिया*
*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠*
*🏘️ A to Z बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*
*प्रोप्रा – राजू मानकर*
*संपर्क 👇*
*📲 मो.9422435601 | 9225784966 | 9561344739*
*💫चिरा, वाळू, खडी, स्टील, सिमेंट, विटा, डबर योग्य दरात मिळेल. काँक्रीट हाॅट मिक्सर, रोड रोलर, जे.सी.बी. जॅक, स्पॅन भाड्याने मिळेल*
*💫सेंट्रींग प्लेट मिळतील.*
*🚰बांधकामासाठी लागणारे पाणी कामावर पोच मिळेल.*
*💫🚗 🚚कार व टेम्पो भाड्याने मिळेल*
*🏡आर.सी.सी. व लोड बेअरींग बंगल्यांची कामे करून मिळतील.*
*🏬सना कॉम्प्लेक्स, आचरा रोड, पोस्ट ऑफिस समोर, कणकवली*
*☎️ ऑफिस*
*9604180156 / 7350288777*
*9225784966*
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*