मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा मुंबई केंद्रांवर दोन ठिकाणी दिनांक २० नोव्हेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत साहित्य संघ मंदिर, गिरगाव आणि यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे रोज सायंकाळी ७ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत मुंबई जिल्ह्यातून एकूण ६० नाट्य प्रयोग प्राथमिक फेरीत सादर होणार आहेत. त्यापैकी काही प्रयोग साहित्य संघ मंदिर, गिरगाव केंद्रावर १५ डिसेंबर नंतर होणार आहेत.
साहित्य संघ मंदिर, गिरगाव केंद्रावर २० नोव्हेंबर रोजी मामला गडबड है! लेखक: राजेश मयेकर दिग्दर्शक: अविनाश गायकवाड, अभिनय साधना, मुंबई, २१ नोव्हें. करार लेखक व दिग्दर्शक : प्रकाश पवार, आकांक्षा पत्रऊंडेशन, मुंबई, २२ नोव्हें. मॅकबेथ, मूळ लेखक : विल्यम शेक्सपियर, अनुवाद: परशुराम देशपांडे, दिग्दर्शक : प्रसिद्धी सोनवणे, बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ, मुंबई, २४ नोव्हें. खटला, लेखक व दिग्दर्शक : तेजस सर्पे, देवांश सामाजिक सेवा संस्था, मुंबई, २५ नोव्हें. ज्याचा त्याचा प्रश्न, लेखक: अभिराम भडकमकर, दिग्दर्शक : वनमाला वेऺदे, ग्रामीण समाज प्रबोधिनी, मुंबई, २७ नोव्हें. वाळू, लेखक : प्रकाश गावडे, दिग्दर्शक : दिनेश गोरेगावकर, हॅपी ग्रुप, मुंबई, २९ नोव्हें. गाढवाची लाथ डायरेक्ट सरकारात, लेखक व दिग्दर्शक: अंकुर वाढवे, मनश्री आर्टस, मुंबई, ३० नोव्हें. बोल राधा बोल, लेखक व दिग्दर्शक : अशोक पालवे मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, नवी मुंबई, १ डिसें. कोणाच्या खांद्यावर, लेखक : डॉ. वासुदेव विष्णूपुरीकर, दिग्दर्शक : भारती पाटील, मुक्ताई एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर ट्रस्ट, मुंबई, ४ डिसें. शेवंता जित्ती हाय, लेखक: प्रल्हाद जाधव, दिग्दर्शक : सुगत उथळे, सचिवालय जिमखाना, मुंबई, ५ डिसें. अपूर्णविराम, लेखक व दिग्दर्शक : विशाल सोनावणे, नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था, वाशी, ६ डिसें. धनंजय माने इथे राहतात का?, लेखक: रुपाली पवार, दिग्दर्शक : नम्रता काळसेकर, प्रवेश कला क्रीडा मंच, मुंबई, ७ डिसें. अण्णांच्या शेवटच्या इच्छा, लेखक व दिग्दर्शक : विजयकुमार राख, ऋतुरंग थिएटर, मुंबई, ८ डिसें. सायं. फ्लाईंग राणी, लेखक: मोहन बनसोडे, दिग्दर्शक: अजिंक्य तळवडेकर, सह प्रमुख कामगार अधिकारी, बृहन्मुंबई म.न.पा., मुंबई, ९ डिसें. लग्नाचा सातबारा तीनतेरा, लेखक व दिग्दर्शक : अवधूत भिसे, सावली प्रतिष्ठान, मुंबई, १० डिसें. आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे, लेखक: वीरेंद्र प्रधान, दिग्दर्शक : नेहा शर्मा, शिवशाही कला क्रीडा सेवा केंद्र, मुबई, ११ डिसें. सप्तपदी, लेखक व दिग्दर्शक : अनिकेत खेडेकर, श्री प्रतिष्ठान, मुंबई, १३ डिसें. गुलमोहर, लेखक व दिग्दर्शक : वैभव जाधव, सुलु नाट्यसंस्था, नवी मुंबई, १४ डिसें. विजयस्तंभ, लेखक व दिग्दर्शक : कुणाल तांबे, तन्मय सांस्कृतिक कलामंच, कळंबोली हे नाट्यप्रयोग होणार आहेत.
तर यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे २१ नोव्हें. या वळणावर, लेखक : राजेंद्र जोशी, दिग्दर्शक : रामेश्वर साळुंखे, इम्पल्स नाट्य संस्था, मुंबई, २२ नोव्हें. निळावंती, लेखक : गोपी भोसले, दिग्दर्शक : शैलेश फणसगावकर, गोदरेज अॅण्ड बॉईज श्रमिक संघ, मुंबई, २३ नोव्हें. चल थोडं ॲडजस्ट करू, लेखक व दिग्दर्शक : संकेत तांडेल, अमर हिंद मंडळ, दादर, २४ नोव्हें. द आऊटबर्स्ट, लेखक : अन्वय अष्टीवकर, दिग्दर्शक : भरत मोरे, अन्वय अष्टीवकर, महापारेषण कला क्रीडा व मनोरंजन क्लब, मुंबई, २८ नोव्हें. येस माय डिअर, लेखक : श्रीनिवास नार्वेकर, दिग्दर्शक : मिलिंद सावंत महाराष्ट्र, कामगार कल्याण मंडळ, मुंबई, २९ नोव्हें. घायाळ, लेखक व दिग्दर्शक : शैलेश चव्हाण, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड, ३० नोव्हें. दिवान-ए-मख्फी, लेखक व दिग्दर्शक : डॉ. सोमनाथ सोनवलकर, माणूस फाऊंडेशन, मुंबई, ४ डिसें. देव चोरला माझा, लेखक : सुमित टॉर, दिग्दर्शक : उदय पाटकर, माझगाव डॉक स्पोर्टस क्लब, मुंबई, ५ डिसें. द इनोव्हेटिव्ह, लेखक व दिग्दर्शक : प्रतिमा कांबळे, मृत्युंजय मित्र मंडळ, मुबई, ११ डिसें. चोर.. चोर.. चोर, लेखक: दिलीप जगताप, दिग्दर्शक : राजीव वेंगुर्लेकर, मुलुंड शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई, १२ डिसें. अंगणातली रांगोळी, लेखक : अरविंद घोंगडे, दिग्दर्शक: प्रणय आहेर, नवदुर्गा मित्र मंडळ, चेंबूर, १३ डिसें. एकेक पान गळावया, लेखक : समीर मोने, दिग्दर्शक : सुनील कदम, पोलीस कल्याण केंद्र, मुंबई, १४ डिसें. मन मनास उमगत नाही, लेखक व दिग्दर्शक : समीर पेणकर, प्रबुद्ध फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई, १५ डिसें. चांदतारा, लेखक : महेंद्र कुरघोडे, दिग्दर्शक : रमाकांत जाधव, श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई, १८ डिसें. सारी रात्र, लेखक : पु. ल. देशपांडे, दिग्दर्शक: कविता विभावरी, सुप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई, २१ डिसें. गुपित, लेखक : प्रभाकर भोसले, दिग्दर्शक: अभिषेक किरण, तरुण उत्साही सेवा मंडळ, मुंबई, २६ डिसें. सांज सावली, लेखक व दिग्दर्शक : मधुकर पवार, ललित कला भवन, नायगाव, २७ डिसें. आर्यम, लेखक : गौतम गायकवाड, दिग्दर्शक : संतोष पवार, वावेदिवाळी ग्रामस्थ मंडळ, मुंबई, २८ डिसें. द रेन इन द डार्क, लेखक : डॉ. सोमनाथ सोनवलकर, दिग्दर्शक : गणेश रेवडेकर, विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई ह्या नाट्य प्रयोगांचे सादरीकरण होणार आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा संपन्न होणार असल्याचे विभीषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी नमूद केले. दरवर्षी जल्लोषात संपन्न होणार्या रंगकर्मींचा सोहळा समजल्या जाणार्या या स्पर्धेस नेहमीच मुंबईकर रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. याही वर्षी सदर स्पर्धेस जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहून कलावंताना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून करण्यात आले आहे.
*संवाद मिडिया*
*💥ऑफर.. ऑफर…💥 दसऱ्यानिम्मित प्रभू कृषि सेवा केंद्र कुडाळकडून भव्य ऑफर..💥*
*Advt Link👇*
————————————————–
💥 *ऑफर…🥳 ऑफर…🥳 ऑफर…💥*
🍃 *!! विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!🍃*
💥 *प्रभू कृषि सेवा केंद्र, कुडाळकडून दसऱ्यानिम्मित भव्य ऑफर.. 😇💥*
▪️बॅटरी स्टार्ट ग्रास कटर
▪️चैन स्वा
▪️बॅटरी पंप
▪️वॉटर पंप
▪️पॉवर स्प्रेअर्स
👉 खरेदी वर 50% पर्यंत सूट💥
👉 आजच भेट द्या…🚶♂️
👉 *टीप : शासकीय अनुदानास सदर स्कीम लागू होणार नाही. नियम आणि अटी लागू*
🎴 *मे. प्रभू कृषि सेवा केंद्र, उदयमनगर, भोगटे कंपाऊंड कुडाळ*
📱 *संपर्क : 9423304173 / 7263832399*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*