वेंगुर्ला प्रतिनिधी:-
काँग्रेसची विचारधारा जोपासणारे व गांधीजींच्या विचारावर चालणारे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने काॅग्रेसच्या विचाराची फारमोठी कधीही भरून न येणारी हानी झाली आहे,अशा शब्दात राष्ट्रीय काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते इर्शाद शेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे काँग्रेस मधील पितृतुल्य व्यक्तिमत्व इंदिराजी गांधीच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून काम केलेले नेते होत. परंतु इंदिराजीच्या मृत्यूनंतर काही काळ ते काँग्रेस पासून दूर होते. परंतु सन १९८९ पासून पुन्हा काँग्रेसच्या प्रवाहात सामील झाले. मनमोहनसिंग यांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते आणि त्यानंतर राष्ट्रपती झाले.काँग्रेसची विचारधारा जोपासणारे व गांधीजींच्या विचारावर चालणारे प्रणवदा आज आपल्यात नाहीत त्यांच्या जाण्याने काॅग्रेसच्या विचाराची फारमोठी कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असे इर्शाद शेख यांनी म्हटले आहे.