You are currently viewing ११ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता पर्वत दिन कार्यक्रम…..

११ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता पर्वत दिन कार्यक्रम…..

वैभववाडी
मानवासह सर्व जीवसृष्टीमधील सजीवांच्या जडणघडणीमध्ये पर्वताची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. पर्वतांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच एकुणच सृष्टीतील त्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने (युनो) दिनांक ११ डिसेंबर,२००२ मध्ये ११ डिसेंबर हा “आंतरराष्ट्रीय पर्वत दिन” म्हणून जाहीर केला. तेव्हापासून हा दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये पर्वत/डोंगरांना अनन्यसाधारण महत्त्व असून विधिवत पूजनाची परंपरा आहे.

आंतरराष्ट्रीय जैवविविधता पर्वत दिन कार्यक्रम साजरा करण्याबाबत अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने आयोजित केलेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे सर्व जिल्हा संघटनांनी/ संस्थानी आंतरराष्ट्रीय जैवविविधता पर्वत दिन साजरा करण्याचे ठरले. त्यानुसार माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेच्या माध्यमातून पहिला कार्यक्रम शुक्रवार दि.११ डिसेंबर रोजी निश्चित केला आहे. या दिवशी सकाळी ठिक १०.०० वा. आंबोली येथील महादेवगड पॉईंट येथे अध्यक्ष श्री.प्रकाश नारकर यांच्या अध्यक्षतेखाली पर्वत पूजन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. यावेळी या क्षेत्रातील तज्ञ बाबला अल्मेडा, हेमंत ओगले व डाॕ.बापू भोगटे हे मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये टीम सिंधुदुर्ग अॕडव्हेंचर टिम,आंबोली रेस्क्यू टीम व बाबला अल्मेडा टिम सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील गिरीप्रेमी, दुर्गप्रेमी तसेच निसर्ग प्रेमीनी सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष श्री.प्रकाश नारकर, उपाध्यक्ष डॉ.कमलेश चव्हाण व सचिव प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा