*’मोडी दर्पण’ दिवाळी अंकाचे प्रकाशन*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
मोडीलिपी संवर्धन करणारा आणि शिवकालीन काळावर नव्याने प्रकाश टाकणारा ‘मोडी दर्पण’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन नुकतेच झाले.
एका वेगळ्या विषयामुळे दर्जेदार आणि अभ्यासनीय असा हा अंक इतर दिवाळी अंकाहून खूप वेगळा आहे. त्यातील साहित्य अत्यंत चोखंदळ असेच आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोडी लिपीतून जो पत्रव्यवहार केला त्याचा लेखाजोखा मोडी दर्पण २०२३ या अंकात वाचायला मिळणार आहे. विशेष म्हणजे घरी बसून मोडी शिकता येईल अशी मोडी ते मराठी अशी ओळख या अंकात अनुभवायला मिळते. त्यामुळे हा यावर्षीचा अंक खूप महत्वाचा वाटतो. अनेक शिव अभ्यासकांनी या अंकात हजेरी लावली असून त्यांनी लिहलेले बरेच लेख नवीन माहिती देणारे असेच आहेत. संपादक सुभाष लाड यांनी १४व्या वर्षाचं शिवधनुष्य उत्तमरीत्या पेलले आहे. मोडीलिपी अभ्यासक व शिवचरित्राचे गाढे अभ्यासक सुनील कदम हे या अंकाचे सहसंपादक आहेत. मुखपृष्ठ प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कुंचल्यातून साकारले आहे.
महाराजांच्या आरमाराविषयी, रामचंद्रपंत अमात्य कृत आज्ञापत्र, आंग्रे घराण्यातील निवडक पत्रे, जावळीचे चंद्रराव मोरे, राजेशिर्के घराणे, सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेलं फोंडा, ऐतिहासिक सावंतवाडी संस्थान, सौंधेकर घराणे, मराठे असे अनेक शिवकालीन विषय या अंकात वाचायला मिळतील.
‘मोडी लिपीचा आणि शिवकालीन घडामोडींचा अभ्यास ह्या दिवाळी अंकामधून होऊ शकतो, त्यामुळे आपल्या घरात आणि आपल्या संग्रही असावा असा हा दिवाळी अंक विकत घेऊन नक्की वाचा’ असे आवाहन सुप्रसिद्ध चित्रकार लेखक विजयराज बोधनकर यांनी केले आहे.
प्रकाशनाच्या या कार्यक्रमाच्या दरम्यान नाशिकच्या मोडीलिपी अभ्यासक दीपा गायधनी यांना मोडी लिपी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारी संपादक विजय हटकर यांनी केले. यावेळी नाटककार डॉ. मंगेश हांदे, चित्रकार सुरेश डुंबरे, लेखक सुरेश हांडे, संघाचे सरचिटणीस प्रमोद पवार, मोडी लिपी जाणकार सुनील कदम, इतिहासकार प्रविण कदम, पत्रकार सुनील आवटी, दीपक नागवेकर, महेंद्र साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*