You are currently viewing श्री साई युवक मंडळ दाभोली तर्फे १७ ते १९ नोव्हेंबरला ‘दिपावली शो टाईम’ चे आयोजन

श्री साई युवक मंडळ दाभोली तर्फे १७ ते १९ नोव्हेंबरला ‘दिपावली शो टाईम’ चे आयोजन

श्री साई युवक मंडळ दाभोली तर्फे १७ ते १९ नोव्हेंबरला ‘दिपावली शो टाईम’ चे आयोजन

वेंगुर्ले

श्री साई युवक मंडळ, दाभोली दाभोलकरवाडी आयोजित यांचेतर्फे दिवाळी सणाचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणे दि. १७ ते १९ नोव्हेंबर कालावधीत दिपावली शो टाईम अंतर्गत विविध स्पर्धा कम सांस्कृतिक व आरोग्य विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री साई युवक मंडळ, दाभोली यांचेवतीने दिपावली शो टाईम अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमांत दि. १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता उदघाटन समारंभ, रात्रौ ८ वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार असून विजेत्या प्रथम क्रमांकास २५००/- व चषक, द्वितीय क्रमांकास २०००/- व चषक, तृतीय क्रमांकास १५००/- व चषक. चौथ्या क्रमांकास १०००/- व चषक पाचव्या क्रमांकास ७००/- व चषक, दि. १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते ५ यावेळेत डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय, वेंगुर्ला यांचेमार्फत कॉम्प्युटरव्दारे मोफत नेत्र तपासणी व हिंदलॅब मार्फत रक्त तपासणी, थाईरॉड, रक्ताचे प्रमाण, शुगर लेवल, कॅल्शियम आदींची तपासणी दाभोली हायस्कुल, दाभोली येथे करण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता वेशभुषा स्पर्धा होणार असून या स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास १५५५/- व चषक, द्वितीय क्रमांकास ११११/- व चषक, तृतीय क्रमांकास ७७७/- व चषक, रात्रौ ८ वाजता वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ, तेडोंली यांचा नाट्यप्रयोग दि. १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता बक्षिस वितरण, रात्रौ ८ वाजता आर्केस्ट्रा असे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांतील स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या लोकांनी आपली नावे देवेंद्र दाभोलकर ८३९०६४०३९४ किंवा रोहित दाभोलकर ७०६६७७०७०४ नाव नोंदणी करण्यासाठी संपर्क साधावा.या दिपावली शो टाईम स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा. तसेच रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन श्री साई युवक मंडळ दाभोली दाभोलकरवाडी यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा