मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
‘स्वामी’ ही संस्था समाजातील गरीब गरजू लोकांसाठी आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण या क्षेत्रात विविध उपक्रम राबवित असते. त्यापैकी एक उपक्रम म्हणजे “कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत दिवाळीची एक आनंदी संध्याकाळ आणि फराळ वाटप”. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिरोडकर सभागृह, परळ, मुंबई येथे मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह परगावाहून आलेल्या ३५० कॅन्सरग्रसरुण आणि त्यांचे नातेवाईकांना दिवाळी फराळासोबत बॅग, साडी, चादर, टॉवेल, साबण, तेल व पावडर इत्यादींचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रमाकांत बिरादार – प्रोजेक्ट डायरेक्टर परिमंडळ २ उपायुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका, दिपक कानोलकर – अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ सायन, भागेश लाड – एम. एस. डब्ल्यू. सायन रूग्णालय, शरद डिचोलकर – अध्यक्ष, फेस्काॅम मुंबई, दिलीपभाई जैन – समाजसेवक, बाबुभाई सोळंकी – समाजसेवक, श्रीकांत कुलकर्णी – चार्टर्ड अकाऊंटंट, पुनम ठाकरे – चार्टर्ड अकाऊंटंट तसेच ‘स्वामी’चे अध्यक्ष – सुरेश लाड, उपाध्यक्ष – श्रीमती वैशाली शिंदे, कार्याध्यक्ष – मोहन कटारे, सचिव – सुरेंद्र व्हटकर आदी उपस्थित होते.
सदर पावन पर्वात कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनोरंजनासाठी स्वामीच्या विरंगुळा ज्येष्ठ नागरिक केंद्राचा सुगम संगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्या कार्यक्रमाचे संयोजन विमल माळवदे, प्रतिभा सावंत, प्रदीप ढगे यांनी केले तर खुमासदार सूत्रसंचालन अनिल तावडे यांनी केले. तालबद्ध वाद्यवृंदाची जबाबदारी हार्मोनियमवर दत्ताराम घाडी, नंदकुमार आरोंदेकर, राजरत्न कदम, ढोलकीपटू दिलीप मेस्त्री, शैलेश तुम्मा, तालवाद्य शिवाजी गावकर, व्हायोलिन मंगेश तळगावकर यांनी सांभाळली. तर उपस्थितांना शुभदा मोरे, शैलजा काळे, वैशाली सूद, सुनिता पारकर, वंदना भाटवडेकर, वैशाली दांडेकर, राजरत्न कदम, गणेश करलकर, जगदीश काळे, कांतीलाल परमार, दिलीप मेस्त्री, रमेश सावंत यांनी आपल्या गायनाने मंत्रमुग्ध केले.
सभागृहात येणाऱ्यांच्या स्वागतासाठी मनमोहक रांगोळी ममता खेडेकर आणि रश्मी नाईक यांनी साकारली होती. मुख्य कार्यक्रमाचे समयसूचक सूत्रसंचालन साध्वी डोके यांनी केले. संस्थेचा परिचय सुरेंद्र व्हटकर यांनी तर आभारप्रदर्शन सुरेश लाड यांनी केले.
रुग्णांची नावनोंदणी करण्यासाठी सुमंगल गुरव, वैशाली शिंदे, सिध्दी परब, नम्रता पडवळ तत्पर होत्या. कार्यक्रमाची व्यवस्था सुरेंद्र व्हटकर, साध्वी डोके, गोविंद राणे, नितीन तांबे, मनियार, तोंडवलेकर, रचना खुळे, प्रतिभा सपकाळ, प्रियांका गायकर, लखबीर कौर, सुरिंदर कौर, नम्रता व्हटकर, सुरेखा निमकर, श्री. कुलकर्णी, योगिनी लाड, उर्मिला जाधव, निलेश पाठारे यांनी चोख सांभाळली.
दीपावलीचा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अध्यक्ष – सुरेश लाड, उपाध्यक्ष – श्रीमती वैशाली शिंदे, कार्याध्यक्ष – मोहन कटारे, सचिव – सुरेंद्र व्हटकर, उपसचिव – साध्वी डोके, सजिनदार – उल्हास हरमळकर, विश्वस्त – गोविंद राणे, श्रीमती रचना खुळे, प्रतिभा सावंत, सल्लागार – किरण करलकर, गजानन माटे, उदय पारकर, तृप्ती पवार, उर्मिला जाधव, तसेच प्रकल्प प्रमुख – मातृपक्ष:- विमल माळोदे, प्रतिभा सपकाळे, रुग्ण साह्य केंद्र:- नितीन तांबे, शिवाजी गावकर, दिवाळी धमाका :- वैशाली ढोलम, ममता खेडेकर, पॅथॉलॉजी:- रश्मी नाईक, रश्मी जाधव, विद्यार्थी सहाय्य योजना:- नम्रता व्हटकर, गीता नाडकर्णी, अवयव दान:- अनिल तावडे, हिरेश चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले.