दिनांक ७ नोव्हेंबर, २०२३ रोजी सायंकाळी ७.३० वाजता *रेणुका आर्टस्* निर्मित आसावरी इंगळे संपादीत *स्पर्श दृकश्राव्य दीपावली अंक, २०२३* चे गुगल मीटवर ज्येष्ठ रंगमंच व चित्रपट अभिनेते श्रीराम पेंडसे यांच्या हस्ते ऑनलाईन प्रकाशन झाले. हा दृकश्राव्य दिवाळी अंक म्हणजे मराठी साहित्यातील क्रांती आहे तसेच साहित्य क्षेत्रात अशा नवनवीन कल्पना उदयास याव्या, असे श्री.पेंडसे त्यांच्या भाषणात म्हणाले. या आभासी प्रकाशन सोहळ्यास या अंकाचे लेखक, कवी, कलाकार आणि इतर मान्यवर यांची लक्षणीय उपस्थिती होती.
*रेणुका आर्टस्* निर्मित *स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंक, २०२३ (वर्ष चौथे)* हा अंक *(Audio Visual)* आहे. साहित्य व कलेचा सुरेख संगम असलेला हा डिजिटल इतर अंकांपेक्षा पूर्णतः वेगळा आहे. आसावरी इंगळे संपादित या अंकात देशविदेशातून सहभागी झालेल्या साहित्यिकांच्या त्यांनीच लिहिलेल्या व सादर केलेल्या कथा, कविता, लेख तर आहेच याशिवाय हौशी कलाकारांचे गायन व हस्तकला देखील आहेत. याव्यतिरिक्त *किलबिल* विभागात बालकलाकारांनी सादर केलेल्या कला देखील आहेत! वाचक व रसिकांसाठी बुकगंगावर उपलब्ध असलेला हा नाविण्यपूर्ण अंक पूर्णतः निःशुल्क आहे. हा अंक पेपरलेस असल्याने पर्यावरणपूरक आहे. आपल्या वेळेच्या सोयीनुसार कधीही, कुठेही, केव्हाही आस्वाद घेता येणारा हा एकमेव अंक आहे.
*स्पर्श दृक्श्राव्य (ऑडियो विझ्युअल) दिवाळी अंक* दोन पद्धतीने बनवलाय, *फ्लिपबुक* आणि *pdf*. प्रत्येकाच्या फोन, लॅपटॉप, पीसीच्या सेटींगनुसार अंक फ्लिपबुक लिंकने न उघडल्यास दुसरी पीडीएफ फाईल उघडून दिवाळी अंकाचा आनंद घेऊ शकता! सध्याच्या कॉम्प्युटर युगाशी ‘मॅच’ करण्यासाठी या अंकात QR कोडचा देखील वापर करण्यात आलाय!
*फ्लिपबुक लिंक -* https://heyzine.com/flip-book/368c2a738c.html
*pdf लिंक -* https://acrobat.adobe.com/link/review?uri=urn:aaid:scds:US:378a8b2c-426e-335c-911b-3903b064c5ba
प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आणि शारदा स्तवन शुची बोरकर यांनी केलं. तर शिल्पा टोपे यांनी उत्कृष्ट सुत्रसंचालन करीत कार्यक्रमात बहार आणली. जयश्री देशकुलकर्णी आणि रेखा तांबे यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त केले. कोकिळा ढाके यांनी आभार प्रदर्शन केले.
*आसावरी इंगळे*
*(संपादिका – स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंक)*
*संपर्क – artsrenuka@gmail.com*
*मो. ९६६२०४३६११*