*”सांग ना मना”*
सुखाच्या पायघड्या,
घातल्या मी तुजसाठी,
तुडवून गेलीस तू दूर,
वेड मन माझं नादान.
सुख वेचण्या चोच दिली,
पंखास तुझ्या दिले बळ,
खुल्या आसमंतात आलं,
तव इच्छांना उधान.
उंच भरारी घेता तू,
जाहले आकाशही ठेंगणे,
उंच उंच शिखरेही तुझं,
आता भासू लागली लहान.
घाव हृदयावर पडताच तुझे,
दुःख जाहले अनावर,
सांग मना घालू कसा,
मी आवर तरी निदान?
(दिपी)
८४४६७४३१९६